Sleeping Disorder Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Disorder : सावधान! तुम्ही देखील ७ तासांपेक्षा कमी झोप घेताय? आरोग्याचे होतेय नुकसान

Sleeping Disease : पुरेशी झोप घेतल्याने मनाला शांती मिळते तसेच पचनक्रिया सुरळीत राहाते.

कोमल दामुद्रे

Sleeping Health Issue :

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींसोबत झोपेच्या देखील सवयींमध्ये बदल झाला आहे. वाढत्या कामाच्या व्यापामुळे जेवणातील बदल, झोपेची वेळ, ताणतणाव, सततचे चहा-कॉफीचे सेवन यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.

पुरेशी झोप घेणे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने मनाला शांती मिळते तसेच पचनक्रिया सुरळीत राहाते. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, किमान ८ ते ९ तासांची झोप घ्यावी, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहाते. ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.

1. ७ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणे अधिक महत्त्वाचे का?

७ तासांमध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात आराम करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे डोके शांत राहाते. या काळात तुमच्या पेशी आणि स्नायू पुन्हा तयार होतात. यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते. पुरेशी झोप घेणे मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहाते.

2. थकवा

जेव्हा ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीराला वेगवेगळ्या झोपेच्या चक्रांमधून जाण्यासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. हा थकवा दिवसभर कायम राहू शकतो. ज्यामुळे कामात मन न लागणे त्यामुळे कामावर नकारात्मक परिणाम होतो.

3. वजन वाढणे

झोप आणि वजन यांचा जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे संतुलित हार्मोन्स बिघडते. त्यामुळे जास्त भूक लागणे, हार्मोन्सची पातळी वाढणे, जास्त कॅलरी आणि साखरेच्या (Sugar) पदार्थांचे अतिसेवन केले जाते. तसेच हार्मोनची पातळीही कमी होऊ लागते. ज्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.

4. मानसिक आरोग्यावर परिणाम

कमी झोप घेतल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा मानसिक आरोग्यावर होतो. आपण झोपल्यानंतर मेंदू नवीन ऊर्जा गोळा करते. पुरेशी झोप न मिळाल्याने मन प्रसन्न राहात नाही. त्यामळे मानसिक समस्यांना (Mental Health) समोरे जावे लागते.

5. हृदयविकाराचा झटका

ज्या वेळी आपण झोपतो, तेव्हा शरीराला आराम करण्यास वेळ मिळतो. परंतु, झोपेच्या अभावामुळे शरीरातील विषारी द्रव्ये साफ होत नाही त्यामुळे उच्च रक्तदाबासह हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT