Diabetic patients SAAM TV
लाईफस्टाईल

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

White rice and blood sugar levels: मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. भारतीय जेवणात भात हा एक मुख्य घटक आहे. त्यामुळे, मधुमेहींनी भात खावा की नाही, हा एक सामान्य प्रश्न आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • पांढरा भात रक्तातील साखर वाढवू शकतो.

  • भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

  • शिजवलेला आणि थंड केलेला भात कमी पचतो.

जगभरात भात खायला आवडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आजकाल तरुणांमध्येही डायबिटीसची प्रकरणं वाढत असल्याने आहारात बदल करणं अनेकांसाठी कठीण झालंय आहे. पांढरा भात म्हणजे कमी तंतुमय आणि जास्त स्टार्चयुक्त धान्य. त्यामुळे तो अनेक डाएटमध्ये टाळला जातो. पण प्रश्न असा आहे की, डायबिटीस असतानाही आपण भात खाऊ शकतो का?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पांढरा भात खाल्ल्यावर रक्तातील साखर पटकन वाढते. मात्र ही वाढ शरीर कशी हाताळते हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. जसं की तुम्ही किती भात खाता, तो कसा शिजवता आणि सोबत काय खाता.

पांढऱ्या भातामुळे रक्तातील साखर का वाढते?

पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. म्हणजे तो पटकन पचतो आणि लगेच रक्तात ग्लुकोजची पातळी वाढवतो. भातात तंतू, प्रथिनं किंवा चरबी फार कमी असल्याने पचनाची गती कमी होत नाही.

ज्यावेळी रक्तातील साखर वाढते तेव्हा शरीरात इन्सुलिनचं प्रमाण झपाट्याने वाढतं. इन्सुलिन साखर पेशींमध्ये पोहोचवतं. पण अचानक वाढ-घट झाल्याने थकवा, दमल्यासारखं वाटणं आणि वारंवार भूक लागणे अशी लक्षणे जाणवतात.

भात खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

भाताचा प्रकार

सगळा पांढरा भात सारखा नसतो. प्रक्रियेमुळे त्यातील स्टार्च आणि तंतूंचे प्रमाण बदलतं आणि त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही बदलतो. तज्ज्ञ सांगतात की, उकडलेला पांढरा भात हा पूर्णपणे पॉलिश केलेल्या भातापेक्षा रक्तातील साखरेसाठी थोडा चांगला पर्याय आहे.

भात शिजवण्याची पद्धत

भात शिजवून थंड करून नंतर खाल्ल्यास त्यातील स्टार्चची रचना बदलते आणि तो कमी प्रमाणात पचतो. यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. म्हणून शिजवून फ्रिजरेटरमध्ये ठेवलेला भात डायबिटीस असणाऱ्यांसाठी तुलनेने फायदेशीर ठरतो.

प्रमाणाचं भान

भात किती खात आहोत हे सर्वांत महत्त्वाचे आहे. जास्त कार्बोहायड्रेट घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही आणि डायबिटीसचा धोका वाढतो. तज्ज्ञ सुचवतात की, ताटातील अर्धा भाग भाज्यांनी, एक चतुर्थांश प्रथिनांनी आणि उरलेला एक चतुर्थांश कार्बोहायड्रेटने भरावा.

मग डायबिटीस असताना भात खायचा का नाही?

मधुमेही रूग्णांनी भात पूर्णपणे टाळायची गरज नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने भात खाल्ल्यास तो डायबिटीसच्या आहारात समाविष्ट होऊ शकतो.

  • नेहमी मध्यम प्रमाणात भात खा.

  • शक्य असल्यास ब्राऊन राईस किंवा इतर पूर्ण धान्य वापरा.

  • थाळीतील अर्धा भाग नॉन-स्टार्च भाज्या आणि प्रथिनांनी भरायला विसरू नका.

  • जेवल्यानंतर नियमितपणे रक्तातील साखर तपासा, त्यामुळे कोणता आहार तुमच्यासाठी योग्य आहे ते लक्षात येईल.

पांढऱ्या भातामुळे रक्तातील साखर का वाढते?

पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे तो पटकन पचून साखर वाढवतो.

डायबिटीस असलेल्यांसाठी कोणता भात चांगला पर्याय आहे?

उकडलेला पांढरा भात पॉलिश केलेल्या भातापेक्षा चांगला पर्याय आहे.

भात शिजवण्याच्या कोणत्या पद्धतीने ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो?

भात शिजवून थंड केल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

थाळीत भाताचे प्रमाण किती असावे?

थाळीच्या एक चतुर्थांश भागात भात असावा.

डायबिटीस असलेल्यांनी भात पूर्णपणे टाळायचा आहे का?

नाही, योग्य प्रमाणात आणि पद्धतीने भात खाता येऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT