Eating 3 eggs every day saam tv
लाईफस्टाईल

Eating 3 eggs every day: रोज 3 अंडी खाल्ल्याने काय होतं? डॉक्टरांनी सांगितलं शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या

रोज तीन अंडी खाल्ल्याने शरीराला किती फायदे मिळतात? अंड्यांमधील प्रोटीन, कोलीन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे वजन नियंत्रण, स्नायूंचे आरोग्य, लिव्हर आणि डोळ्यांना कसा फायदा होऊ शकतो, जाणून घ्या. मात्र, रोज किती अंडी खावीत हे वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असते.

Surabhi Jayashree Jagdish

चांगल्या आरोग्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात शरीराला उब मिळावी म्हणून अनेक जण अंडी खातात. पण अंडी खाण्याचे फायदे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. रोज अंडी खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. डॉक्टरही शरीराला पुरेसं प्रोटीन मिळावं यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. पण रोज 3 अंडी खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे मिळतात? जाणून घेऊया.

रोज 3 अंडी खाण्याचे फायदे

हिवाळ्यात अंडी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रोज तीन अंडी खाल्ल्याने शरीरात अनेक चांगले बदल होऊ शकतात. ISIC मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोबिलिअरी सायन्सेस विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉक्टर शुभम वात्स यांनी अंडी खाण्याचे काही फायदे सांगितलेत. त्यांच्या मते अंडी खाल्ल्याने वजन कमी करण्यासोबतच लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासही मदत होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर

डॉक्टर शुभम यांनी सांगितलं की, रोज तीन अंडी खाऊन त्यांनी तीन वर्षांत स्वतःचं 38 किलो वजन कमी केलंय. त्यांच्या मते, तीन अंड्यांमधून शरीराला सुमारे 18 ग्रॅम चांगल्या दर्जाचे प्रोटीन मिळतं. या प्रोटीनमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो अॅसिड असतात. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि व्यायामानंतर त्यांची झालेली झीज भरून काढण्यासाठी हे घटक उपयोगी ठरतात. त्याचप्रमाणे शरीरातील चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेलाही मदत करतात.

लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत

अंड्याचा पिवळा भाग म्हणजेच एग योक हा कोलीन नावाच्या पोषक घटकाचा चांगला स्रोत आहे. हा घटक लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करतो. तसंच लिव्हरचं काम व्यवस्थित सुरू राहण्यासही त्याचा फायदा होतो. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य जपण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर मानले जाते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

अंडी खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढण्यास मदत होते. तर खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते.

शरीराला मिळतात अनेक पोषक घटक

अंड्यांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी अंडी हा चांगला पर्याय मानला जातो. अंड्याच्या पिवळ्या भागात झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्सही असतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

त्याचप्रमाणे अंड्यांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करणारे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान कमी होण्यास आणि अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे अंड्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. वजन कमी करण्यापासून ते लिव्हर आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यापर्यंत अंडी उपयोगी ठरू शकतात. नियमित अंडी खाल्ल्याने महिनाभरातच शरीरात चांगले बदल दिसू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच गोकुळचे १६ संचालक माघारी

Accident News : भीषण अपघात! लग्न समारंभातून परतताना कार नदीत कोसळली; कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Ramayana Collection : 'रामायण' ठरला बॉक्स ऑफिसचा किंग! रणबीर-यशच्या चित्रपटाने रचला बॉलिवूडमध्ये इतिहास, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

BJP: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान भयंकर घडलं

Hidden Forts : हिवाळ्यात फिरायचंय? सह्याद्रीच्या कुशीत लपलेले 'हे' १० सुंदर किल्ले ठरतील खास, मित्रांसोबत करा भटकंती

SCROLL FOR NEXT