Belly Fat Tips; पोटाची चरबी वाढण्याचे नक्की कारण काय? saam tv news
लाईफस्टाईल

Belly Fat Tips; पोटाची चरबी वाढण्याचे नक्की कारण काय?

पोटाची चरबी (belly Fats) कमी करण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. पण त्याचा हवा असा परिणाम मिळत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यदायी (Health) शरीराचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे वाढलेले पोट. ज्याच्या पोटावर चरबीचे (Belly Fats) प्रमाण जास्त असते, त्या व्यक्तीचे आकर्षण कमी होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. पण त्याचा हवा असा परिणाम मिळत नाही. खरंतर पोटाची चरबी वाढण्यामागे नक्की कारण काय आहे, हेच लोकांना मुळात माहित नसते. मग अशा वेळी सर्व उपाय करुनही लोकांना निश्चित परिणाम मिळाला नाही की ते निराश होतात. (Belly Fat Tips; What exactly is the reason for the increase in belly fat?)

पोटातील चरबीचे प्रकार त्याच्यामागील कारणावर अवलंबून असतात. हे प्रकार इतर शारीरिक समस्यांचे लक्षण देखील असू शकते.

पोटाच्या चरबीचे प्रकार

1. हार्मोनल बेली

जेव्हा शरीरातील विविध हार्मोन्स असंतुलित होतात, तेव्हा आपल्या पोटावर चरबी वाढू लागते. याला हार्मोनल बेली म्हणतात. हार्मोनल चरबीपासून मुक्त होण्यासाठी आपण डॉक्टरांच्या मदतीने हार्मोन्समध्ये संतुलन राखलं पाहिजे, त्यासोबतच आरोग्यासाठी हानीकारक असलेले अन्नपदार्थ म्हणजेच जंक फूडही खाऊ नये

2. ब्लोडेड बेली (फुगलेले पोट)

वारंवार जंक फूड खाणे आणि व्यवस्थित न खाणे, खाल्ल्यानंतर झोपणे इत्यादीमुळे फुगलेल्या पोटाचीसमस्या उद्भवू शकते. ज्यामुळे तुम्हाला वाटते की तुमचे पोट वाढत आहे. त्यापासून मुक्त होण्यासाठी नियमित व्यायाम करा, निरोगी आहार घ्या, झोपेच्या दोन तास आधी जेवण करा.

3. स्ट्रेस बेली (ताणतणावामुळे वाढलेले पोट)

जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पोटाभोवती चरबी जमा होण्यास सुरुवात होते आणि लठ्ठपणा होऊ शकतो. या प्रकारच्या चरबीपासून मुक्त होण्यासाठी, तणाव दूर करा. आपण डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि ध्यानधारनेद्वारेही पोटीची चरबी कमी करू शकता.

4. लो बेली (वजन कमी करण्यासाठी)

जेव्हा आपल्या शरीराचा वरचा भाग पातळ राहतो आणि केवळ पोटाची चरबी वाढते, तेव्हा बेली फॅट म्हणतात. खराब जीवनशैली आणि पचनसंस्थेतील समस्यांमुळे अशा प्रकारची पोटावर चरबी वाढते. अशा वेळी वाढलेले पोट कमी करण्यासाठी फायबर युक्त पदार्थ आणि हिरव्या भाज्या खाव्या. त्याबरोबर व्यायाम करण्यास विसरू नका.

5. मॉम बेली (प्रसुतीनंतर वाढलेले पोट)

आई बनल्यानंतर अनेक महिलांचे पोट वाढते. बाळाला जन्म दिल्यानंतरही महिला अद्यापही गर्भवती असल्याचे दिसतात. अशा प्रकारची चरबी जायला वेळ लागतो. पण काळजी करू नका. पुरेशी विश्रांती घ्या. निरोगी आहार घ्या आणि थोडीशी योगासने व्यायाम करा.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT