Cold symptoms SAAM TV
लाईफस्टाईल

Cold symptoms: सर्दी आणि फ्लूमध्ये नेमका फरक काय? ही लक्षणं दिसताच कोणता आजार आहे ते ओळखणं होईल सोपं

Flu symptoms: ऋतू बदलताना सर्दी, अॅलर्जी आणि फ्लूची लक्षणे अनेकदा सारखी वाटतात. मात्र ताप, अंगदुखी, थकवा, खोकला आणि नाक वाहण्यासारख्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन फरक ओळखता येतो. फ्लूपासून बचावासाठी लसीकरण आणि आवश्यक काळजीही जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बदलते हवामान, अचानक पडणारा पाऊस आणि वाढते प्रदूषण यामुळे श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. अशा वेळी सर्दी, अॅलर्जी आणि फ्लू यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. या तिन्ही आजारांमध्ये काही लक्षणं सारखीच दिसत असल्याने अनेकदा नेमका त्रास कशामुळे झाला आहे, हे ओळखणं कठीण जातं. मात्र लक्षणांची तीव्रता आणि त्यासोबत दिसणारी इतर चिन्हं लक्षात घेतल्यास फरक समजण्यास मदत होते.

शिंकणं, खोकला, ताप, थकवा, नाक बंद होणं किंवा नाक वाहणं आणि घसा खवखवणं ही लक्षणे सर्दी, अॅलर्जी आणि फ्लूमध्ये दिसू शकतात. मात्र, सामान्य सर्दीच्या तुलनेत फ्लूची लक्षणे अधिक तीव्र असतात.

वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल जे. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, प्रचंड थकवा आणि कोरडा खोकला ही फ्लूची प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे.

फ्लूपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी इन्फ्लूएंझाची लस घेणं प्रभावी ठरू शकतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना लसीकरणाचा फायदा होऊ शकतो.

दरवर्षी फ्लूच्या विषाणूमध्ये बदल होत असतात. त्यामुळे विषाणू प्रकारांपासून संरक्षण मिळावं यासाठी फ्लूची लसही त्यानुसार अद्ययावत केली जाते. लसीकरणासोबतच काही साध्या सवयीही संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झाकणं, नियमितपणे हात धुणं आणि आजारी असताना इतरांपासून अंतर राखणं यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होते.

त्यामुळे ऋतू बदलताना आरोग्याची काळजी घेणं, लक्षणांकडे लक्ष देणं आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे सण उत्सव साजरी करणे अनिवार्य

महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ऑगस्ट अखेरीस राज्यात ५४ टक्के पावसाची तूट, वेधशाळेने दिली माहिती महत्वाची माहिती

Short Hair Hairstyle: लहान केसांसाठी १० मिनिटांत करा 'या' क्विक हेअरस्टाईल; ऑफिस ते पार्टीपर्यंत दिसाल स्टायलिश

Raksha Bandhan: भाऊ किंवा बहीण नाही, तर 'या' व्यक्तीला बांधू शकता राखी

नेपाळमधील महापुरात २८८ भारतीय बेपत्ता; कोणत्या राज्यांतील किती नागरिक? परराष्ट्र मंत्रालयाकडून तपशीलासह हेल्पलाइन नंबर जाहीर

SCROLL FOR NEXT