Throat infection in Marathi, health issue, causes of a sore throat
Throat infection in Marathi, health issue, causes of a sore throat ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

घसा खवखवण्याचे नेमके कारण काय ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ऋतूमानानुसार किंवा प्रदूषणामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारारी जाणवू लागतात. थंड-गरम पदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला घश्याला त्याचा त्रास होतो. (causes of a sore throat)

हे देखील पहा -

सर्दी, ताप किंवा खोकला यांसारखी लक्षणे दिसू लागली की, कोरोनाची (Corona) भिती वाटू लागते. पण या आजारांतून आपण बरे झाल्यानंतरही आपल्याला खोकला किंवा घश्यात अनेक वेदना होऊ लागतात. घसादुखीचा त्रास वाढू लागल्यास त्याची लक्षणे नेमकी काय हे आपण जाणून घ्यायला हवे व वेळीच त्यावर उपचार केल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. आपल्याला घशात कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत असेल तर समजून घ्या की ते घसा खवखवण्याचे लक्षण असू शकते. सहसा याकडे कोणी लक्ष देत नाही आणि नंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

१. घशात जळजळ किंवा खाज लागत असेल तर ते लक्षण घसा खवखवण्याचे असू शकते. कधी कधी कमी पाणी कमी प्यायल्याने किंवा अधिक गरम पदार्थ खाल्ल्याने हा त्रास जाणवू शकतो.

२. घश्याच्या आतील भागाल कधीकधी लाल ठिपके येतात किंवा खोकल्याचे प्रमाण वाढल्याने घशात सूज येते ज्यामुळे घसा खवखवण्याचा त्रास वाढू लागतो.

३. सतत बर्फाचे पाणी (Water) प्यायल्याने घसा दुखीचा त्रास उद्भवू शकतो. अनेकदा आपल्याला थंड पाणी प्यायल्याने हा त्रास जाणवू लागतो. घसादुखीसोबतच घशाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.

४. शहरात प्रदूषणाची पातळी वाढली की दूषित हवा आपल्या घशात प्रवेश करतो व त्याचा विपरीत परिणाम आपल्या घशावर होऊ लागतो. त्यामुळे घसा खवखवण्याची शक्यता वाढते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही उद्भवतात.याशिवाय मसालेदार अन्न आणि दारू पिण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

SCROLL FOR NEXT