Refrigerator Colour Vastu saam tv
लाईफस्टाईल

Refrigerator Colour Vastu: घरात फ्रिज कोणत्या रंगाचा असावा? रंगानुसार घरात पडतो पैशांचा पाऊस; वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

Fridge Colour as Per Vastu: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजसाठी कोणता रंग शुभ मानला जातो? पांढरा, क्रीम, हलका निळा की हिरवा? जाणून घ्या फ्रिजच्या रंगाचं महत्त्व, घराच्या दिशेनुसार योग्य रंग आणि काळा, ग्रे यांसारखे गडद रंग टाळण्यामागील वास्तुशास्त्रीय मान्यता काय आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

घर सजवताना आपण प्रत्येक गोष्टीची निवड विचारपूर्वक करतो. घरातील फर्निचर, भिंतींचे रंग, पडदे यांसोबतच फ्रिजसारख्या वस्तूंचा रंगही आवडीने निवडला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तूंचे रंगही महत्त्वाचे मानले जातात. कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या रंगांचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर होतो, असं वास्तुशास्त्र आणि रंगांच्या अभ्यासात सांगितलं जातं. त्यामुळे घरासाठी फ्रिज घेताना त्याच्या रंगाची निवडही विचार करून करावी, असा सल्ला दिला जातो.

वास्तुशास्त्रानुसार रंगांचा संबंध पंचतत्त्व आणि ग्रहांशी जोडला जातो. या रंगांचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर आणि मनावर होऊ शकतो अशी मान्यता आहे. त्यामुळे घरात शक्यतो हलक्या आणि साध्या रंगांचा वापर करावा, असं सांगितलं जातं.

पांढरा रंग

पांढरा रंग शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. हा रंग मनाला स्थिरता देतो. तसंच विचारांमध्ये स्पष्टता आणण्यास मदत करतो असं मानलं जातं. पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठीही हा रंग फायदेशीर ठरू शकतो.

क्रीम किंवा ऑफ व्हाइट रंग

क्रीम रंग सौम्यपणा आणि स्थिरतेचं प्रतीक मानला जातो. या रंगामुळे घरातील वातावरण शांत राहतं आणि कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध चांगले राहण्यास मदत होते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या वाढीसाठीही हा रंग शुभ मानला जातो.

हलका निळा रंग

हलका निळा रंग जलतत्त्वाशी जोडला जातो. हा रंग मनाला शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो, असं मानलं जातं. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमसाठी हा रंग चांगला मानला जातो.

हलका हिरवा रंग

हिरवा रंग निसर्ग आणि प्रगतीचं प्रतीक आहे. हा रंग आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे घरात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठीही हलका हिरवा रंग चांगला असल्याचं सांगितलं जातं.

घराच्या कोणत्या दिशेला कोणता रंग शुभ?

वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेचं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे त्या दिशेनुसार योग्य रंग निवडल्यास घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

उत्तर दिशा

उत्तर दिशा जलतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला हलका निळा रंग वापरणं शुभ मानलं जातं.

पूर्व दिशा

पूर्व दिशा सूर्य आणि ऊर्जेशी जोडली जाते. त्यामुळे या दिशेला हलका हिरवा रंग वापरणं चांगलं मानलं जातं. हा रंग प्रगतीसाठी मदत करणारा असल्याचं सांगितलं जातं.

ईशान्य दिशा

घराच्या ईशान्य दिशेला पांढरा किंवा क्रीम रंग वापरणं शुभ मानलं जातं. या रंगांमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि चांगली ऊर्जा मिळते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

फ्रिजसाठी गडद रंग का टाळावेत?

वास्तुशास्त्रानुसार घरात गडद निळा, काळा आणि ग्रे रंग वापरणं शक्यतो टाळावं असं सांगितलं जातं. या रंगांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि जडपणा वाढू शकतो, अशी मान्यता आहे. काळ्या रंगामुळे आळस आणि उदासीनता वाढू शकते, तर राखाडी रंगामुळे मानसिक थकवा आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Maharashtra News Live Update: 2029 पंढरपूरमध्ये विहिरीचा कठडा कोसळून अपघात, चार मजूर अडकल्याची भीती

Death News: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कर्करोगामुळे लेकीचे निधन

Ginger And Turmeric Drink: सकाळी आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Gold Price Today: सोन्याच्या दरात भलीमोठी घसरण! सोनं - चांदीचे भाव कोसळले, वाचा १८,२२ आणि २४ कॅरेटच्या किंमती

SCROLL FOR NEXT