Ganesh Chaturthi lucky color by zodiac saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi: राशीनुसार गणेश चतुर्थीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल? कोणता नैवेद्य दाखवाल हे जाणून घ्या

Ganesh Chaturthi lucky color by zodiac: गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होणारा एक प्रमुख सण आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार बाप्पाचे स्वागत करतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार काही विशिष्ट रंगांचे कपडे परिधान केल्यास आणि बाप्पाला काही खास पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास तुम्हाला त्यांच्या कृपेने अधिक लाभ मिळू शकतो.

मेष

मनोवृत्तीत शांतता येणे आपल्यासाठी गरजेचे आहे. आपल्या राशीने शुभ्र धवल, दुधाळ रंगाचा वापर करणे श्रेयस राहील.

नेवैद्य - गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

दान - विशेष सुवर्णदान करावे.

वृषभ

श्रद्धापूर्वक गणेश व्रत करावे. आपल्या राशीला हिरव्या रंगाच्या सर्व छटा, पिस्ता रंग विशेष फलदायी ठरेल.

नैवेद्य - गणेशाला सांजाच्या पोळीचा नैवेद्य केळीच्या पानावर दाखवावा.

दान - रौप्य, चांदी दान करावे.

मिथुन

मुळातच बौद्धिक असणारी आपली रास, बुद्धीदाता गणपती याची उपासना करताना पांढरा, चंदेरी रंग आपल्याला फलदायी ठरेल.

नेवैद्य - गणपतीला मोतीचुराच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

दान - ब्राह्मणाला पाचूरत्न दान केल्यास चांगली फले मिळतील.

कर्क

भावनात्मक असणारी आपली रास. श्रद्धाभाव नक्कीच जागृत होणार आहेत. आपल्या राशीला सोनेरी केशरी रंग विशेष फलादायी ठरेल.

नैवेद्य - पंचामृताचा नैवेद्य ( दूध, दही, साखर, मध, तूप (तुळशी पत्र घालून)) दाखवावा.

दान - मोती हे रत्न दान करावे.

सिंह

मानसन्मान, समाजामध्ये वाढण्याच्या दृष्टीने आपल्याला मिश्र रंगांचा वापर फलदायी ठरू शकतो.

नैवेद्य - साजूक तुपातील गव्हाच्या खिरीचा नैवेद्य गणपतीला दाखवा.

दान - सुवर्णदान आपल्या राशीला योग्य आहे.

कन्या

मनातील मनोरथ पूर्ण होण्यासाठी विशेषत्वाने सोनेरी रंग, हलका निळा रंग आपल्याला फलदायी ठरेल.

नैवेद्य - सर्व सुकामेवा असलेले डिंकाच्या लाडवाचे नैवेद्य गणेशाला दाखवावा.

दान - नवीन वस्त्र गणेशाला दान केल्यास उत्तम फळे मिळतील.

तुळ

प्रेमाचा रंग गहिरा म्हणतात. तसेच प्रेम भावाने गणेशाची सेवा कराल. आपल्यासाठी गडद लाल, मरून रंग फलदायी ठरेल.

नैवेद्य - उत्तम सुकामेवायुक्त गाजर हलवा, मूग हलवा याचा नैवैद्य दाखवावा.

दान - अन्नदान आपल्या राशीला योग्य ठरेल.

वृश्चिक

पुढील आपली सर्व काम नियोजित पद्धतीने होण्यासाठी सोनेरी रंग चॉकलेटी रंग यांचा वापर आज करा.

नैवेद्य - गुळपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करावा.

दान - आपल्याला आवडेल असे कोणतेही दान करावे .फक्त आपले हे दान आज गुप्त असावे.

धनू

जे करणार ते प्रामाणिकपणे करणार. अशी आपली रास आहे. देवाचे करताना सुद्धा मनामध्ये प्रामाणिक भाव असतील. आपल्यासाठी निळा रंग, निळा सर्व छटा फलदायी ठरतील.

नैवेद्य- साजूक तुपातली बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

दान - धातूची समई दान केल्यास फलदायी ठरेल.

मकर

मेहनतीचे फळ आपल्याला या उत्सवात मिळणार आहे. सहज कार्य होण्यासाठी गडद रंगाचा वापर हिरवा, निळा फलदायी ठरेल.

नेवैद्य - गोड करंजी साटोऱ्यांचा नैवेद्य दाखवावा.

दान - निळा रंगाचे वस्त्र कद ,उपरणे इत्यादी दान करावे

कुंभ

सहज भाव जागृत होतील. मनात किल्मीष न राहता गणेशाची सेवा घडेल. आकाशी रंग, हलके निळे रंग फलदायी ठरतील.

नैवेद्य - केशर युक्त शेवयाच्या खिरीचा निबंध दाखवावा.

दान - यथाशक्ती गुरुजींना दक्षिणा द्यावी.

मीन

सात्विकता जपून पूजा करावी. प्रेमळ भाव निर्माण होतील. केशरी गुलाबी, हलका लाल रंग फलदायी ठरेल.

नैवेद्य - पुरणपोळीचा नैवेद्य गणपतीला दाखवा.

दान - अन्नदान, पानाचा विडा आपल्या राशीला दान म्हणून चांगले आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता; तुमचं तर नाव नाही ना?

Hingoli Crime : भेंडेगावमध्ये दोन गटात वाद; वाहनांची तोडफोड करत केली मारहाण

Atal Setu Potholes : १७ हजार कोटींच्या अटल सेतूवर खड्डेच खड्डे | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Shocking: धक्कादायक! पैशांवरून टोकाचा वाद; महिलेने जेवणात मिसळलं विष, नवरा अन् सासऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT