Hysterectomy effects saam tv
लाईफस्टाईल

Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

Uterus Removal Effects: गर्भाशयाशी संबंधित गंभीर समस्या असल्यास हिस्टरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात.

Surabhi Jayashree Jagdish

गर्भाशय हा महिलांच्या प्रजनन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गर्भाशय मासिक पाळी, गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी आवश्यक प्रक्रिया घडतात. अनेक वेळा महिलांना गंभीर आरोग्याच्या समस्या होतात जसं की, जास्त रक्तस्त्राव, गर्भाशयात गाठ (फायब्रॉइड), एंडोमेट्रियोसिस किंवा कॅन्सर यामुळे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गर्भाशय काढून टाकावं लागतं.

गर्भाशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत हिस्टेरेक्टॉमी असं म्हटलं जातं. या शस्त्रक्रियेनंतर शरीरात मानसिक आणि शारीरिक बदल जाणवू लागतात. हे बदल नेमके काय असतात ते पाहूयात.

कोणत्या कारणांमुळे काढावं लागतं गर्भायश?

  • गरजेपेक्षा जास्त किंवा असामान्य मासिक पाळीतील रक्तस्त्राव

  • गर्भाशयात फायब्रॉइड किंवा ट्यूमर

  • एंडोमेट्रियोसिस किंवा अॅडिनोमायोसिस

  • गर्भाशय, गर्भाशयाच्या मुखाचा किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर

  • पेल्विक इन्फेक्शन किंवा गर्भाशय खाली सरकणे (प्रोलॅप्स)

गर्भाशय काढल्यानंतर काय होते?

  • गर्भाशय काढल्यानंतर महिलांची गर्भधारणा करण्याची क्षमता संपते.

  • त्याचप्रमाणे शरीरातील हार्मोन्सचं उत्पादन थांबतं.

  • गर्भाशय बाहेर काढल्यानंतर महिलांची मासिक पाळी पूर्णपणे बंद होते.

  • गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलांना गर्भधारणा करता येत नाही.

शारीरिक बदल कोणते दिसून येतात?

गर्भाशय काढल्यानंतर अचानक हार्मोन्समध्ये घट झाल्यामुळे शरीरात उष्णता जाणवणे. यावेळी काही महिलांना अचानक जास्त गरम वाटण्याची शक्यता असते. याशिवाय रात्रीच्या वेळेस घाम येणं, चिडचिड होणं, थकवा येणं आणि झोप न येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्वचा आणि केसांवरील परिणाम

शस्त्रक्रियेनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे त्वचा खरखरीत होऊ लागते. याशिवाय केस गळण्याची समस्या वाढू शकते आणि यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT