vitamin b12 deficiency google
लाईफस्टाईल

Vitamin B12च्या कमतरेचं कारण काय? या ३ चुका आत्ताच टाळा, अन्यथा...

Vitamin Deficiency: व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळे थकवा, स्मरणशक्ती कमी होणे व मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात. योग्य आहार, तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

विकेंडला लोक मोठ्या संख्येने बाहेर हॉटेल्समध्ये जाऊन जेवतात. काहींना घरातल्या पदार्थांची इतकी चांगली चव लागत नाही, जितकी बाहेरच्या पदार्थांची किंवा जेवणाची लागते. पण या पदार्थांमध्ये असे काही पदार्थ असतात. ज्यामुळे तुम्हाला मिळणारे व्हिटॅमिन्स कमी होतात. तुम्ही जितका सात्विक आहार घेता तितकेच तुम्ही निरोगी राहता. पण काहींच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे त्यांना व्हिटॅमिन्स मिळत नाहीत. अशावेळेस लोक त्याच्या गोळ्या घेणं पसंत करतात.

अनेकांना व्हिटॅमिन्सची कमतरता आहे हे खूप उशीरा कळतं. कारण त्याची लक्षणे माहित नसतात किंवा ते सामान्य म्हणून दुर्लक्षित करतात. पुढे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन्स शरीराच्या योग्य कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यापैकी व्हिटॅमिन B12 मेंदू व मज्जासंस्थेचे आरोग्य, लाल रक्तपेशींची वाढ आणि डीएनएसाठी महत्वाचं आहे. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचं दिसून येतं. या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, स्मरणशक्ती कमी होते, हाता-पायांना मुंग्या येतात. याने भविष्यात गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं.

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वैशालीचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. पंकज चौधरी यांच्या मते, व्हिटॅमिन B12 ची कमतरता जे लोक शाकाहारी आणि व्हेगन आहार घेतात त्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. कारण हे व्हिटॅमिन मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त असतात. पण वाढतं वय, पचनसंस्थेचे आजार, क्रोन्स डिसीज, सिलिएक डिसीज किंवा पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरात B12 शोषलं जात नाही. काही औषधांचा बरेच दिवस वापर आणि अती प्रमाणात मद्यपान हे याला कारणीभूत ठरतं.

सतत B12 ची कमतरता राहिल्यामुळे अ‍ॅनिमिया, मानसिक तणाव, नैराश्य, हृदयविकाराचा धोका तसेच गर्भधारणेच्या वेळेस अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेत तपासणी करून आहारात दूध, दही, अंडी, मासे, मांस किंवा फोर्टिफाइड पदार्थांचा समावेश करणं गरजंचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपच्या बंडखोरांवर भाजप कडून कारवाई

Ragi Cake Recipe: लहान मुलांसाठी स्पेशल नाचणी गूळाचा पौष्टिक केक, १५ मिनिटांत तयार

Payal Gaming Private Video: प्रसिद्ध यूट्यूबरचा MMS व्हायरल, 19 मिनिटांचा धक्कादायक व्हिडिओ; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Politics: पुण्यात राजकारण तापलं! भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात, असा करा बॅलेन्स चेक

SCROLL FOR NEXT