Wrong Blood Group saam tv
लाईफस्टाईल

Wrong Blood Group: चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवल्यास माणसाचा लगेच मृत्यू होतो का? शरीरावर काय होतो परिणाम?

Wrong Blood Group Side Effect: जर चुकून एखाद्या रुग्णाला त्याच्या रक्तगटाशी न जुळणारे रक्त दिले गेले, तर शरीरात एक गंभीर आणि जीवघेणी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते. ही वैद्यकीय चूक अत्यंत दुर्मिळ असली तरी, त्याचे शरीरावर होणारे परिणाम गंभीर असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

माणसाच्या शरीरातील रक्त हे खूप महत्त्वाचं आहे. पण हेच रक्त जर दुसऱ्या व्यक्तीचं असेल आणि शरीराशी जुळणारं नसेल, तर त्याचे परिणाम अत्यंत घातक ठरू शकतात. रुग्णालयात जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा त्याला रक्त चढवण्याची ट्रान्सफ्युजन प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया सामान्य वाटली तरी, ती खूपच नाजूक आणि संवेदनशील असते. अशातच जेव्हा चुकीचा ब्लड ग्रुप चढवला जातो तेव्हा ते खूप धोकादायक असतं.

चुकीचं रक्त चढवलं की काय होतं?

डॉक्टरांच्या मते, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला चुकीच रक्त चढवलं जातं जे त्याच्या शरीराच्या ब्लड ग्रुपशी जुळत नाही तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली (इम्यून सिस्टीम) त्या रक्ताला 'बाहेरचा धोका' समजते. याला वैद्यकीय भाषेत Acute Hemolytic Transfusion Reaction (AHTR) म्हटलं जातं.

यामध्ये शरीर त्या बाहेरून चढवलेल्या रक्तावर प्रतिक्रिया देतं आणि त्याला नष्ट करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतो. परिणामी, रक्तातील पेशी फाटायला लागतात आणि शरीराचे विविध अवयव यामुळे बाधित होतात.

लवकर दिसणारी लक्षणं कोणती?

  • अचानक ताप येणं

  • छातीत किंवा पाठीमागे तीव्र वेदना

  • श्वास घेण्यात अडचण

  • लघवीचा रंग लालसर किंवा गडद होणं

  • रक्तदाब अचानक खाली जाणं

  • शरीरावर सूज येणं

  • अ‍ॅलर्जी होणं

जर ही लक्षणं वेळेत ओळखली नाहीत आणि त्वरित उपचार झाले नाहीत, तर ही परिस्थिती किडनी फेल्युअर, शॉक किंवा मृत्यू यासारख्या गंभीर स्थितीला कारणीभूत ठरू शकते.

अशा चुका का घडतात?

सामान्यतः हॉस्पिटल किंवा ब्लड बँकमध्ये रक्त चढवण्यापूर्वी 'ब्लड टायपिंग' आणि इतर आवश्यक चाचण्या केल्या जातात. पण जर कुणाकडून निष्काळजीपणा झाला, रक्ताच्या बाटलीचं लेबेल चुकीचं लागलं किंवा आपत्कालीन परिस्थितीत योग्य चाचणी न करता रक्त चढवलं गेलं, तर हे जीवघेणं ठरू शकतं.

अशा चुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

बॉडी टायपिंग नक्की तपासा- रुग्णाला रक्त चढवण्यापूर्वी त्याचा ब्लड ग्रुप अचूक तपासलेला असावा.

क्रॉस-मॅचिंग आवश्यक आहे- डोनर आणि रुग्ण यांचं रक्त एकत्र करून त्यांचा परस्पर परिणाम तपासणं आवश्यक आहे.

माहिती ठेवा- रुग्णाच्या कुटुंबीयांनीही कोणत्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवलं जात आहे, याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT