Bowel cancer treatment saam tv
लाईफस्टाईल

Bowel cancer symptoms: आतड्यांच्या कॅन्सरची सुरुवातीला कोणती लक्षणं दिसून येतात? पाहा कशी असते उपचारपद्धती

Bowel cancer treatment: आतड्याचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. पण जर त्याचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले, तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. या कर्करोगाची लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखी वाटतात

Surabhi Jayashree Jagdish

कॉलोन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे. जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, याचं प्रमाण जास्त दिसून येतं. मांसाहाराचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेल्या आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतो.

कोरिया, जपान आणि तैवानसारख्या आशियाई देशांतील लोकांच्या मोठ्या आतड्यात पॉलिप्स नावाच्या छोट्या गाठी आढळतात. वेळेत उपचार न केल्यास या गाठी हळूहळू कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात. ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार असतो, त्यांना इतरांच्या तुलनेत सहा ते दहा पट जास्त प्रमाणात मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा आजार आतड्याच्या आतील आवरणावर परिणाम करतो.

मोठ्या आतड्याच्या उजव्या बाजूचा भाग तुलनेने मोठा असल्याने, या भागातील कॅन्सरची लक्षणं लवकर दिसत नाहीत. उलट डाव्या बाजूचा व्यास लहान असल्याने मलावरोध होऊन रोगाचं निदान लवकर होतं.

कारणं

आनुवंशिकता

कुटुंबात आधीपासून कर्करोगाचा इतिहास असल्यास किंवा भाऊ-बहीण यांना हा आजार झाला असल्यास, त्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः कुटुंबातील पहिल्याच पिढीत एखाद्याला हा आजार झाल्यास, इतर सदस्यांसाठी जोखीम अधिक असते.

अयोग्य आहार

प्रक्रिया केलेलं अन्न, कमी फायबर असलेला आहार, जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि असंतुलित आहार यामुळे आतड्याच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

जीवनशैली

व्यायामाचा अभाव, दुपारी जास्त वेळ झोपणं, धूम्रपान, मद्यपान या सवयींमुळेही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

लक्षणं

  • अन्न न पचणं, अपचन, गॅस आणि पोट फुगणं

  • शौचावाटे रक्तस्राव

  • अचानक वजन कमी होणं

  • थकवा व अशक्तपणा

  • दीर्घकालीन पोटदुखी

  • कावीळ होणं

उपचार

शस्त्रक्रिया

मोठ्या आतड्याचा आजारी भाग काढून टाकून, उर्वरित मोठं आतडं किंवा छोटं आतडं जोडून दिलं जातं.

केमोथेरपी

कॅन्सरची वाढ थांबवण्यासाठी फॉलफॉक्स पद्धतीची केमोथेरपी दिली जाते. साधारण १५ दिवसांच्या अंतराने १२ मात्रांचा (सहा महिन्यांचा) कोर्स केला जातो.

रेडिएशन थेरपी

क्वचितच गरज भासल्यास ही पद्धत वापरली जाते.

टार्गेटेड थेरपी

यात मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जातात. या थेट कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतात.

निदान पद्धती

कोलोनोस्कोपी

ही सर्वात महत्त्वाची तपासणी असून, यामध्ये डॉक्टर कॅमेऱ्याच्या सहाय्याने आतड्यातील गाठी पाहतात व त्याची बायोप्सी करून कर्करोग आहे का याची खात्री करतात.

बायोप्सी

गाठीचा एक लहानसा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासला जातो.

इतर चाचण्या

सीटी स्कॅन, एक्स-रे, पेट स्कॅन यांच्या मदतीने कर्करोग इतर अवयवांपर्यंत पसरला आहे का हे पाहता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT