Kidney Stone Symtoms yandex
लाईफस्टाईल

Kidney Stone: शरीरात 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; असू शकतं किडनी स्टोन,अशी घ्या काळजी

Kidney Stone Symptoms: चुकीच्या जीवनशैली आणि अनहेल्दी डाएटमुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवते. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनीला गंभीर नुकसान होऊ शकते. शरीरात कोणती लक्षणं दिसल्यास किडनी स्टोनची समस्या ओळखता येते, जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात किडनी स्टोनची समस्या खूप सामान्य आहे. ही समस्या २५-४५ वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक दिसून येते. काही रिसर्चमध्ये असे आढळून आले की पुरुषांना किडनी स्टोनचा महिलांपेक्षा तिप्पट धोका असतो. दरवर्षी भारतात सुमारे ५०-७० लाख लोक या समस्येने ग्रस्त असतात. चुकीच्या जीवनशैली आणि अनहेल्दी आहारामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवते. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनीला गंभीर नुकसान होऊ शकते.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, जे लोक कमी पाणी पितात, वाईट आहार घेतात, कुटुंबात किडनी स्टोनचा इतिहास आहे किंवा रोजच्या आहारात जास्त मीठ आणि साखरचा वापर करतात. त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले आणि पुरेसे पाणी प्यायले तर ही समस्या टाळता येते. कोणती लक्षणं दिसल्यास किडनी स्टोनची समस्या ओळखता येते, जाणून घ्या.

किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणे

किडनी स्टोन तयार होण्याची समस्या खूप वेदनादायक असू शकते. वेळीच त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास, स्टोनची वाढ रोखता येते. आणि योग्य उपचार करता येतात. म्हणून यापैकी कोणतेही लक्षणं दिसल्यात त्वरित डॅाक्टरांशी संपर्क करा.

१. पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या एका भागात वेदना जाणवणे.

२. वेदनांसोबत मळमळ किंवा उलट्या होणे.

३. लघवी करताना वेदना होणे किंवा लघवीतून रक्त येणे.

४. लघवी करण्यास असमर्थ असणे.

५. जास्त वेळा लघवी करण्याची गरज वाटणे.

६. ताप किंवा थंडी लागणे.

७. लघवीला दुर्गंधी येते किंवा फेस येतो.

किडनी स्टोनपासून आराम कसा मिळवायचा

किडनी स्टोनची लक्षण जिसल्यास सर्वप्रथम डॅक्टारांशी संपर्क साधून त्यंचा सल्ला घ्या. योग्य ती औषधे घ्या. किडनी स्टोनचे उपचार हे स्टोन किती मोठे आहेत आणि किती आहेत यावर अवलंबून असतात. काही लोकांना स्टोन बाहेर काढण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे लहान दगड मूत्रमार्गे जाण्यास मदत होते. आणि मोठ्या स्टोनसाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज असू सकते. लिंबूवर्गीय फळे म्हणजेच सिट्रस फळांचा रोजच्या आहारत समावेश करणे, नियमितपणे पाणी पिणे आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जास्त खाणे या गोष्टी देखील किडनी स्टोनच्या समस्येवर फायदेशीर ठरु शकतात.

किडनी स्टोन कसे रोखायचे?

डॉक्टरांच्या मते, काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास किडनी स्टोनची समस्या टाळता येते. शरीराला हायड्रेट ठेवून, संतुलित आहार घेऊन आणि पुरेसे कॅल्शियमचे सेवन करून तसेच फळे आणि भाज्या यांचा रोजच्या आहारात समावेश करुन ही समस्या टाळता येते. किडनी स्टोन टाळण्यासाठी, पालक अधिक फायदेशीर मानले जाते. म्हणून अनेकदा पालक पूर्णपणे धुऊन आणि शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अजून महत्वाच बाब म्हणजे पाण्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT