vajan kase kami karave Saam Tv
लाईफस्टाईल

How To Lose Weight: डाएट आणि जीम न करता वजन कमी करायचंय? ६ टिप्स फॉलो करा

How to lose fat without exercise in Marathi: तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जिम आणि डाएटिंग करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी खास टिप्स आहेत.

Vishal Gangurde

बहुतांश जाड व्यक्तीला सडपातळ आणि वजन कमी करण्याची इच्छा असते. मात्र वजन कमी करणे सोपे काम नाही. एखाद्याचं वजन सातत्याने वाढत असेल तर त्याची फारच चीडचीड होते. तुम्हीही यामुळे त्रस्त असाल. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जिम आणि डाएटिंग करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी खास टिप्स आहेत.

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. तुम्ही काही पद्धतीने अवघ्या १० दिवसांत २-३ किलोग्राम वजन कमी करू शकता.

वॉटर इनटेक

तुम्ही स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी खूप महत्वाची भूमिका निभावते. सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगलं राहते.

जेवणानंतर शतपावली करणे

जेवण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे चालल्याने पचन अन्न पचन होण्यास मदत होते. तसेच कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. जेवणानंतर चालल्याने रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते.

फायबर अधिक खा, साखरेचं सेवन कमी करा

भाज्या, सॅलेड, सूपचं सेवन वाढवावं. एका वेळेच्या जेवणात भाज्या, मोड आलेले कडधान्यांचा समावेश करावा. सायंकाळी सात वाजल्यानंतर गहू आणि तांदळाचे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा. नाश्त्यामध्ये ड्राय फ्रुट्स, चणे, फळे खावेत. रात्री हार्ड ड्रिंक घेऊ नयेत.

घरातील जेवण सेवन करा

अनेकांनी तुम्हाला घरातील जेवण खाण्याचा सल्ला दिला असेल. सध्या लोक ज्या प्रकारची जीवनशैली जगत आहेत, या काळात बाहेरचं अन्न खाणे सामान्य बाब आहे. मात्र, जेवणात फॅट आणि तेलाचं प्रमाण अधिक असल्यास तुमचं वजन वाढतं. त्यामुळे घरात तयार केलेलं जेवण ग्रहण करावे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

साखर आणि मीठ कमी खावे

साखर आणि मीठापासून तयार झालेले बिस्किट, केक, वेफरचे सेवन कमीत कमी करावे. साखरपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं. अधिक मीठ खाल्ल्याने पोट फुगल्यासारखं वाटतं.

व्यायाम

दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. त्यासाठी जिम जाणे गरजेचे नाही. योगा, चालणे, काही मिनिटांची एक्सरसाइज केल्याने फीट राहता. काही मिनिटांच्या एक्सरसाइज फायदेशीर ठरू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT