ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात, व्यायाम करतात.
वजन कमी करण्यासाठी चहा प्यावा की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
वजन कमी करण्यासाठी चहाचे सेवन मर्यादेपेक्षा जास्त करु नये.
वजन कमी करताना दिवसातून जास्तीत जास्त दोन कप चहा प्यावा.
जेवणाआधी आणि जेवणानंतर चहा पिणे टाळा. यामुळे पचनक्रिया होण्यास समस्या होऊ शकते.
जेवणात आणि चहा पिण्यात कमीत कमी अर्ध्या तासाचे अंतर असावे.
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा पचनक्रियासंबंधित आजार असतील तर रात्री चहा पिणे टाळा.
रिकाम्या पोटी कधीच चहा पिऊ नये. असे केल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
ही माहिती सामन्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधावा.