ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या वातावरणात बदल होत आहे. उकाडा वाढल्याने अनेकदा काहीजण जेवत नाही. जेवणाच्या वेळा चुकवतात.
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळांमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो.
यामुळे अनेकदा अपचनाच्या समस्या होतात. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणे अंत्यत गरजेचे असते.
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
बेरी या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमची पचनसंस्था व्यवस्थित ठेवेल.
एवाकॅडोमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एवाकॅडोमध्ये फायबर जास्त असते. त्यामुळे भूक कमी लागते.
धान्यांमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, तांबे, मॅग्नेशियम असते. यामुळे शरीराला खूप फायदे होतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.