Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : Messi सारखे फिट दिसायचे आहे ? आहारात समावेश करा 'या' पदार्थाचा

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण फिटनेसचा विचार करत नाही.

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips : वाढलेले वजन कमी करायचे असेल तर अनेकदा आपल्याला चिंता वाटू लागते. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण फिटनेसचा विचार करत नाही. आपल्याला अनेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीसारखे फिट दिसायचे असते.

अनेकदा यासाठी प्रेरणा म्हणून फुटबॉल खेळाडूंकडून पाहिले जाते. फुटबॉल हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्ही तंदुरुस्त नसल्यास 90 मिनिटे सतत धावणे कठीण होईल. अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने स्वबळावर देशाला फिफा विश्वचषक चॅम्पियन बनवले.

हे तितकं सोपं नाही, त्यासाठी फिट आणि तंदुरुस्त शरीर आवश्यक आहे. तुम्हालाही असेच शरीर हवे असेल, तर व्यायामासोबतच तुम्हाला सकस आहार घ्यावा लागेल, तरच तुम्ही तुमचे वजन राखू शकाल.

Black chickpeas

काळ्या हरभऱ्यामध्ये पोषक घटक आढळतात

भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर व्यायामासोबतच सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी तुम्ही काळा हरभरा खाऊ शकता जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काळ्या हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, फोलेट, तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह यासह अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, त्यामुळे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी काळा हरभरा प्रभावी का आहे?

1. पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, काळ्या हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आणि फायबर आढळतात, त्यामुळे ते पोटाची चरबी कमी करून शरीराला बळकटी देण्याचे काम करते. यासोबतच रोजची प्रोटीनची गरज पूर्ण होते.

2. जे लोक काळ्या हरभऱ्याचे नियमित सेवन करतात त्यांच्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते, ज्यामुळे लठ्ठपणा तर कमी होतोच पण हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. हरभरा खाल्ल्याने विष्ठेद्वारे हानिकारक ट्रायग्लिसराइड शरीरातून बाहेर पडतात.

काळ्या हरभऱ्याचे सेवन कसे करावे?

  • काळे हरभरे एका भांड्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी खा.

  • अंकुरलेले हरभरे खाल्ले तर ते आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरेल.

  • काही लोक हरभरा कांदा, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून खातात जे चवदार आणि आरोग्यदायी असते.

  • याशिवाय भाजलेले हरभरे स्नॅक्स म्हणून खाल्ले तर लठ्ठपणा नक्कीच कमी होतो.

  • हे लक्षात ठेवा की हरभरा जास्त तेलात (Oil) शिजवल्यानंतर कधीही खाऊ नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT