ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलींच्या हातांची शोभा हि त्यांच्या लांब आणि सुंदर नखांमुळे वाढते. पण नखं थोडी मोठी झाल्यावर लगेच तुटू लागतात.
नखांना मजबूत आणि वाढविण्यासाठी लोक अनेक प्रकारचे तेल मालिश आणि जेलचा वापर करतात.
शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे देखील नखं तुटण्याचे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत, चांगला आहार घेणे आणि केमिकल फ्री प्रोडक्टस वापरल्याने नखांचे आरोग्य सुधारू शकते.
जर तुमची नखं लवकर तुटत असतील किंवा वाढ कमी होत असेल तर, काही घरगुती उपाय वापरुन बघा. त्याने तुमची नखं स्ट्रॉग होण्यास मदत होईल.
तुमची नखं स्वच्छ करा आणि नंतर नारळाच्या तेलात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने ती घासून घ्या. त्यानंतर नखांना मालिश करा.
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू तुमचे नखं मजबूत करतील. एका लिंबाचा रस काढून तो तुमच्या नखांवर लावा आणि १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
तुम्ही तुमची नखं मजबूत करण्यासाठी जैतुण तेल देखील लावू शकता. जैतुण तेलामध्ये अनेक पोषक तत्वे असतात.
तुमची नखं नेहमी स्वच्छ ठेवा. नखांच्या आत घाण साचू देऊ नका आणि हात धुतल्यानंतर नखे कोरडी करा.
नखं जास्त लांब झाल्यावर ती कापात राहा . नखं कापल्याने त्यांची वाढ चांगली होते आणि ती मजबूत होतात.
प्रत्येकजण आपल्या नखांना नेलपॉलिश लावतो. एका आठवड्यानंतर, नेलपॉलिश काढून टाका आणि नखं स्वच्छ व मोकळी ठेवा. ३-४ तासांनंतर पुन्हा नेलपॉलिश लावा.