वजन कमी करणे हे ध्येय नसून ते आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये प्रत्येक छोट्या गोष्टीलाही खूप महत्त्व आहे. आपण काय खातो, कसे खातो, खाल्ल्यानंतर काय करतो यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींचाही वजन कमी होण्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर काय करता हे तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत ज्या रात्रीच्या जेवणानंतर लक्षात ठेवायला हव्यात. जेणेकरुन वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे?
जेवल्यानंतर लगेच झोपू नका. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने पचन गती मंदावते आणि जेवणाचे रुपांतर फॅट्समध्ये होऊन वजन वाढते. जेवल्यानंतर थोडा वेळ हलके चाला. रात्रीच्या जेवणानंतर 20-30 मिनिटे हलके चालण्याने पचन सुधारते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. जेवल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्या. पाणी पचनास मदत करते. शरीराला आवश्यक पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. आणि शरीर हायड्रेट राहते. याशिवाय तुम्ही जेवल्यानंतर ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे पचनसंस्था सुरुळीत ठेवण्यास मदत करते.
जेवताना टीव्ही पाहू नका. टीव्ही पाहताना तुम्ही जेवणावर लक्ष केंद्रीत न करता जेवत राहता त्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. तसेच जेवताना मोबाईल फोन वापरू नका. मोबाईल फोनवर स्क्रोल केल्याने तुम्हाला अन्नाचा संपूर्णपणे आस्वाद घेण्यास अडथळा येतो आणि यामुळे तुम्ही भूकेपेक्षा जास्त खाणे होऊ शकता. या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण झोप घ्या. वजन कमी करण्यासाठी ७-८ तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलित होते, ज्यामुळे भूक अधिक वाढते.
दररोजच्या जीवनातील शक्य तेवढा तणाव कमी करा. तणावामुळे खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा इतर तणाव कमी करणाऱ्या अॅक्टिव्हिटी करा. तसेच तुम्ही जेवणात काय खाता यावर तुमचे वजन अवलंबून आहे. यासाठी दररोज संतुलित आहार घ्या. रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश करा. आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट पदार्थ टाळा. प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट जसे की पांढरा भात, ब्रेड आणि पेस्ट्री खाणं टाळा.
तुमच्या खाण्याच्या नोंदी ठेवल्याने तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होऊ शकते. जेवताना अन्न हळूहळू खा. आणि अन्न नीट चावून खा. तसेच जेवताना जेवण लहान भागांमध्ये खा. मोठ्या भागांमध्ये खाण्याऐवजी, लहान भागांमध्ये खा. जेवल्यानंतर दात घासा. खाल्ल्यानंतर दात घासल्याने इतर काही खाण्याची तुमची इच्छा कमी होऊ शकते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited By : Priyanka Mundinkeri