Weight Loss Tips saam tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: माधुरीच्या नवऱ्याने सांगितला वजन कमी करण्याचा फंडा

dr.shreiram nene weight loss tips: डॉ. नेने म्हणतात, ' जर वजन कमी करायचे तर खाणे सोडून चालणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षित अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम करत असते. त्यातचं तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे इंस्टा अकाउंटवर सतत काही महत्वाच्या टिप्स सगळ्यांसोबत शेअर करत असतात. सध्या त्यांनी वजन कमी करण्याची एकदम सोप्पी पद्धत चाहत्यांना सांगितली आहे. त्यांनी या विषयी सविस्तर व्हिडीओ केला आहे.

त्यात वजनासंबंधीत काही महत्वाच्या सोप्या टिप्स त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. तुम्ही पाहत असाल तर सोशल मिडियावर अनेक वजन कमी करण्याचे व्हिडिओ असतात. मात्र या व्हिडिओमध्ये डॉक्टरांचा थेट सल्ला चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाईलमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्याच्या टिप्स

डॉ. नेने म्हणतात, 'जर वजन कमी करायचे तर खाणे सोडून चालणार नाही. उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही. उपाशी राहिल्याने तुम्हाला थकवा येवू शकतो. त्यात तुम्ही जर जास्त कार्ब्सचे सेवन करत असाल तर, शुगर लेव्हल अचानक वाढू शकते.

त्याचसोबत इन्सुलिन स्पाइक होते. त्यामुळे उपाशी राहणे टाळतात.तुम्हाला जर सतत भूक लागत असेल तर तुम्ही दुसऱ्या गोष्टींचा विचार करा किंवा तुम्ही काहीतरी कामात गुंतून राहा. तुम्ही त्यावेळेस च्युइंगम खावू शकता.'

नाश्त्यात काय खावे?

तुमचा नाश्ता तुमचे वजन नियंत्रित करतो. त्यात तुम्ही तेलकट, मैदा किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ले की तुमचे वजन लगेचचं वाढते. त्यासाठी डॉ. नेने म्हणतात, 'तुम्ही सकाळी नाश्त्यात व्हाईट ब्रेड, शुगरी सीरियल्स, प्रोसेस्ट मीट, स्वीटेंड योगर्ट आणि फळांचा ज्युस यांचा समावेश करु नये. खासकडून पॅकेटमधल्या फळे असलेला ज्युसचे सेवन करु नका. ' या महत्वाच्या टिप्स त्यांनी चाहत्यांना दिल्या आहेत.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Written By: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: अमित ठाकरेंना भाजपचा पाठींबा, माहीममधून सरवणकर माघार घेणार? BJP च्या भूमिकेने शिंदेंची कोंडी?

Maharashtra News Live Updates: पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वाद

Pune Politics : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीचे फटाके, शहराध्यक्षांच्या पोस्टने चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra Election : मुंबईतील या १८ जागांवर भाजप लढणार?

एक नंबर! Airtel ची धमाल ऑफर; 'या' ३ प्लॅन्ससोबत मिळेल ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स

SCROLL FOR NEXT