Weight loss diabetes medicine saam tv
लाईफस्टाईल

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Weight Loss Medicine Ozempic: डॅनिश औषध कंपनी Novo Nordisk ने भारतात आपले लोकप्रिय औषध Ozempic (Semaglutide) लाँच केले आहे. हे औषध वजन कमी करण्यास मदत करते तसेच टाईप २ मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.

Surabhi Jayashree Jagdish

डेन्मार्कची औषध निर्माता कंपनी Novo Nordisk ने त्यांचं डायबिटीजचं औषध Ozempic भारतात लॉन्च केलंय. कंपनीने याची 0.25 mg सुरुवातीच्या डोसची किंमत 2,200 रुपये ठेवली आहे. एका अहवालानुसार, भारताच्या बाजारात हे औषध 0.25 mg, 0.5 mg आणि 1 mg या डोसमध्ये उपलब्ध होणार आहे. Ozempic हे टाईप-2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी आठवड्याचं इंजेक्शन आहे. जे 2017 पासून अमेरिकासह जगातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या किमतीनुसार, 1 mg डोसची किंमत प्रति महिना 11,175 रुपये आहे. तर 0.5 mg डोसची किंमत 10,170 रुपये प्रति महिना असणार आहे. 0.25 mg डोससाठी दर महिन्याला 8,800 रुपये खर्च करावे लागणार आहेत. आठवड्याच्या आधारावर 0.25 mg ची सुरुवातीची किंमत 2,200 रुपये प्रति आठवडा असणार आहे.

भारताची औषध नियामक संस्था CDSCO ने ऑक्टोबर 2024 मध्ये Ozempic (Semaglutide) ला टाईप-2 डायबिटीज असलेल्या प्रौढ व्यक्तींना वापरण्यास मंजुरी दिली होती. अमेरिकेतील FDA ने दिलेल्या माहितीनुसार, हे औषध योग्य आहार आणि व्यायामासोबत घेतल्यास रक्तातील ब्लड शुगर ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे टाईप-2 डायबिटीज असलेल्या आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यात हे औषध उपयुक्त ठरतं.

वजन कमी करण्यात Ozempic कशी मदत करते?

Ozempic शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या GLP-1 हार्मोनसारखं काम करतं. यामध्ये रक्तातील साखर वाढल्यावर हे इन्सुलिनचे उत्पादन वाढवतं. पोट रिकामं होण्याची प्रक्रिया मंदावते ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. जास्त डोस घेतल्यास भूक कमी होते. त्यामुळे अनेक देशांमध्ये ही औषध ऑफ-लेबल पद्धतीने वजन कमी करण्यासाठी देखील वापरलं जातं.

या औषधाचे दिसून येणारे साईड इफेक्ट

या औषधाचे काही सामान्य दुष्परिणामही सांगण्यात आले आहेत. यामुळे Pancreas मध्ये सूज येण्याचा धोका असतो. पित्ताशयाशी Gallbladder संबंधित समस्या उद्भवू शकतात. या वापरादरम्यान मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sofia Ansari: सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण, बोल्ड फोटोंनी केलं सेलिब्रेशन

Maharashtra Live News Update: मनसेकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी

Mumbai Local Mega block : मुंबईत मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल; कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

मंत्री येत नसतील तर बिबटे सोडा, मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात संताप|VIDEO

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

SCROLL FOR NEXT