Homemade Protein Powder Recipe saam tv
लाईफस्टाईल

Homemade Protein Powder Recipe : वजन कमी करण्यासाठी घरीच्या घरी बनवा 'हेल्दी प्रोटीन पावडर', जाणून घ्या रेसिपी

लोक प्रोटीन पावडर बाजारातून किंवा ऑनलाइन खरेदी करतात.

कोमल दामुद्रे

Homemade Protein Powder Recipe : आजकाल प्रत्येकाला फिट राहायला आवडते. बॉडी बनवण्यापासून ते ती जशीच्या तशीच राहावी असा प्रत्येकाचा अट्टहास असतो. आजकाल लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्यामध्ये जिमचा समावेश करतात.

ट्रेनर्स जिममध्ये जाणाऱ्यांना प्रोटीन पावडरची घेण्यास सांगतात, कारण ते अधिक ऊर्जेचे स्रोत आहे. लोक प्रोटीन पावडर बाजारातून किंवा ऑनलाइन खरेदी करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की हे आरोग्यदायी पद्धतीने घरी बनवता येते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पदार्थांनी तुम्ही घरी प्रोटीन पावडर बनवू शकता.

इंस्टाग्रामवर लोकप्रिय भारतीय शेफ आणि फूड रायटर तरला दलाल यांनी वजन कमी करण्यासाठी ही सोपी शाकाहारी प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर केली आहे.

1. प्रथिने पावडर तयार करण्यासाठी या घटकांची आवश्यकता असेल

  • १ कप बदाम

  • ½ कप अक्रोड

  • ½ कप कच्चे अनसाल्ट केलेले कच्चे शेंगदाणे

  • 1/4 कप पिस्ता

  • 1/4 कप काजू

  • 2 चमचे कच्चे टरबूज बिया

  • 2 टेबलस्पून कच्च्या भोपळ्याच्या बिया

  • 2 चमचे कच्चे सूर्यफूल बियाणे

  • 1 टेबलस्पून कच्चे फ्लेक्स बियाणे

  • दोन चमचे चिया सीड

  • 1/4 कप बारीक चिरलेल्या वाळलेल्या खजूर

2. प्रोटीन पावडर कशी बनवायची?

होममेड व्हेज प्रोटीन पावडर बनवण्यासाठी, नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि बदाम मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे कोरडे भाजून घ्या. यानंतर वेगळ्या ताटात काढून त्याच तव्यावर अक्रोड, शेंगदाणे, पिस्ते आणि काजू एकामागून एक मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या आणि ताटात वेगळे काढा.

Homemade Protein Powder Recipe

यानंतर एका पॅनमध्ये खरबुजाचे दाणे, भोपळ्याचे दाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि जवसाच्या बिया मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. त्यांना बाहेर काढा आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी त्याच प्लेटमध्ये ठेवा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात चिया सीड आणि कोरडे खजूर घालून ब्लेंडरच्या करून बारीक पावडर बनवा.

3. प्रोटीन शेक बनवण्यासाठी प्रोटीन पावडर कशी वापरायची?

  1. एका ग्लासमध्ये एक कप गरम दूध घ्या.

  2. तीन चमचे होममेड प्रोटीन पावडर मिसळा.

  3. गोडपणासाठी तुम्ही त्यात एक ते दोन चमचे मधही घालू शकता.

  4. चांगले शेक करा, तुमचा होममेड प्रोटीन शेक झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT