Weight Loss Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : ऑफिसमध्ये एकाच जागी बसून असतात ? वजन वाढले ? असे करा कढीपत्याचे सेवन, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

Overweight Problem : हल्लीच्या तरुण पिढीमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Curry Leave Benefits : वाढते वजन ही हल्ली एक समस्याच बनली आहे. बिघडलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपले वजन वाढत असते. हल्लीच्या तरुण पिढीमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.

ऑफिसमध्ये (Office) काम असू देत किंवा सतत एकाच ठिकाणी बसल्याने अनेकदा आपले वजन वाढते. लठ्ठपणा ही यातील एक समस्या आहे. मुलगा असो की मुलगी, वाढत्या वजनामुळे आजकाल सगळेच त्रस्त आहेत. अशा स्थितीत तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी तुम्ही कढीपत्ता वापरू शकता. जेवणाची चव वाढवणारी कढीपत्ता आरोग्यासाठीही (Health) खूप फायदेशीर आहे.

जीवनसत्त्वे (Vitamins) ए, बी, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, कढीपत्ता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच कोलेस्टेरॉल कमी करण्यातही ते खूप प्रभावी आहे. पण तुम्हाला माहित आहे का कढीपत्ता वजन कमी (Weight loss) करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता कसा वापरावा-

कढीपत्ता पाणी

1. साहित्य

  • 10 ते 20 कढीपत्ता

  • एक चमचा मध

  • अर्धा चमचा लिंबाचा रस

2. कृती

  • सर्व प्रथम, एका भांड्यात एक ग्लास पाणी ठेवा.

  • आता त्यात 10 ते 20 कढीपत्ता टाका आणि चांगले उकळा.

  • पाणी चांगले उकळले की ते गाळून घ्या.

  • आता त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस घाला.

  • हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा होईल.

3. रिकाम्या पोटी चघळणे

जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता वापरायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चावा. कढीपत्ता चघळल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चरबीही कमी होते. इतकेच नाही तर त्यात असलेले क्लोरोफिल तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि उत्साही ठेवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT