Weight Loss Diet Plan Saam Digital
लाईफस्टाईल

Weight Loss Diet Plan : वजन कमी करताय? सावधान !; वजन घटवलं, आयुष्य उद्ध्वस्त झालं

Weight Loss : वाढणारं वजन घटवण्यासाठी अनेक उपद्व्याप केले जातात. मात्र असाच एक उपद्व्याप पुण्यातील इंजिनियर असलेल्या उज्वला कांबळेंच्या आयुष्यावर बेतलाय. वजन कमी करण्यासाठी हसत खेळत गेलेल्या उज्वला शस्त्रक्रियेनंतर कायमच्या अंथरुणाला खिळल्यात?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

वाढणारं वजन घटवण्यासाठी अनेक उपद्व्याप केले जातात. मात्र असाच एक उपद्व्याप पुण्यातील इंजिनियर असलेल्या उज्वला कांबळेंच्या आयुष्यावर बेतलाय. वजन कमी करण्यासाठी हसत खेळत गेलेल्या उज्वला शस्त्रक्रियेनंतर कायमच्या अंथरुणाला खिळल्यात? नेमकं काय घडलं उज्वला कांबळेंसोबत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

वाढणारं वजन ही जगातली सर्वात मोठी समस्या. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्रयोग अनेक जण करत असतात. असाच एक आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रयोग पुण्यातल्या लोहगावमध्ये राहणा-या 36 वर्षीय उज्वला कांबळे यांनी केला...उज्ज्वला या एका आयटी कंपनीत इंजिनीअर होत्या. त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं. मात्र लग्नानंतर काही वर्षांत उज्वला यांचं वजन 84 किलोंवर गेलं. त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली आणि एरंडवणेतल्या डिझायर क्लिनिकशी संपर्क साधला...तब्बल 3 लाख रूपये खर्च करून उज्ज्वला यांनी सर्जरी केली आणि त्यांच्या आयुष्याचा घात झाला. या सर्जरीमुळे त्या कायमच्याच अंथरुणाला खिळल्याचा आरोप त्यांचे पती बिरेंद्र शर्मा यांनी केलाय. त्यांच्यावर डिझायर क्लिनिकचे डॉक्टर प्रशांत .यादव आणि भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील नागे यांनी लिपोसक्शन ही चुकीची सर्जरी केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय.

उज्ज्वला कांबळे यांच्यावर सर्जरी करताना भूल दिल्यानंतर त्यांचे पल्स रेट, बीपी आणि ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करणं आवश्यक होतं. ते न केल्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठाच झाला नाही आणि त्यांच्या मेंदूला कायमची इजा पोहचली. त्यामुळे डिझायर क्लिनीकसह डॉक्टरांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या लिपोसस्शन सर्जरीनं उज्ज्वला यांचं आयुष्य उद्धवस्त केलं त्याविषयी साम टीव्हीनं सत्य जाणून घेतलं. आम्ही जेव्हा सर्जरीतज्ज्ञांना भेटलो तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

काय आहे लिपोसक्खन सर्जरी ?

लायपोसक्शन हे वजन कमी करण्याची सर्जरी नाही

लिपोसक्शन सर्जरी ही शेपिंगसाठी केली जाते

शरीरातील कॉस्मेटिक बदलासाठी ही सर्जरी केली जाते

लायपोसक्शन ही एका प्रकारची प्लास्टिक सर्जरी असल्याची माहिती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

आहारमधील बदल

व्याय़ामाच्या विशिष्ट पद्धती

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं

BMI 35 पेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यांनं ऑपरेशनल ट्रीटमेंट करण्यात येते. त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वजन कमी करण्याची ट्रीटमेंट घ्या. वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण नको नको त्या जाहिरातींना बळी पडतात आणि ऐन उमेदीच्या काळात 36 व्या वर्षी उज्ज्वला कांबळें यांच्यासारखं अंथरुणाला खिळतात. त्यामुळे अशा फसवणा-या डॉक्टरांपासून सावध राहा. लाखो रुपये लुटून चुकीची सर्जरी करून रुग्णांचं आयुष्य उद्धवस्त करणा-या डॉक्टरांचा परवानाच रद्द करायला हवा. म्हणजे समाजातील आणखी उज्ज्वला कांबळे अशा बोगस डॉक्टरांना बळी पडणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT