Weekly Numerology Saam Tv
लाईफस्टाईल

Weekly Numerology 2024 : या २ मूलांकांसाठी हा आठवडा ठरेल लकी! नवरा-बायकोच्या नात्यात दूरावा, पैशांची पडेल पाऊस; तुमचा मूलांक यात आहे का?

Weekly Numerology 2024 : पंचांगानुसार मूलांक १ ते ९ पर्यंत मोजला जातो. जो जातकाच्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो. जन्मतारखेच्या आधारे जाणून घेऊया १ ते ९ अंक असलेल्या लोकांसाठी जानेवारी हा आठवडा कसा राहील.

कोमल दामुद्रे

Numerology Future Prediction Date Of Birth :

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह, राशी, नक्षत्र आणि मूलांकाला अधिक महत्त्व आहे. ज्याप्रमाणे नावाचे पहिले अक्षर महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे जन्मतारखेचा मूलांक देखील अधिक महत्त्वाचे ठरते.

पंचांगानुसार मूलांक १ ते ९ पर्यंत मोजला जातो. जो जातकाच्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो. जन्मकुंडलीनुसार जाणून घेऊया अंकशास्त्र हे सर्वात यशस्वी ज्योतिषशास्त्र आहे. ग्रहाच्या स्थितीनुसार या आठवड्यात मोठे शुभ संयोग घडणार आहेत. जन्मतारखेनुसार जाणून घेऊया कोणत्या मूलांकाना मकर संक्रांतीचा हा आठवडा लकी ठरणार आहे.

1. मूलांक-१

जानेवारीचा हा आठवडा कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती देईल. आर्थिक गोष्टींसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनात दूरावा येण्याची शक्यता आहे. नात्यांची (Relation) वेळीच काळजी (Care) घ्या. संयम राखणे अधिक गरजेचे आहे.

2. मूलांक-२

कामात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. आर्थिक गोष्टीत हळूहळू लाभ होतील. कर्जापासून सुटका होईल. वैवाहिक जीवनातील समस्या जोडीदारासोबत (Partner) बसून सोडवा. त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहिल. जीवनात सुख-शांती येईल.

3. मूलांक-३

आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहिल. जोडीदाराशी संबंध चांगले होतील. नोकरीत ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल.

4. मूलांक-४

अपूर्ण कामे लवकर पूर्ण होतील. या आठवड्यात सुरु केलेले कोणतेही काम भविष्यात दीर्घकाळ लाभ देऊ शकते. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी हा आठवडा थोडा त्रासदायक ठरेल.

5. मूलांक-५

या आठवड्यात बाहेर जाण्यचा प्लान करु शकता. आर्थिकदृष्टीकोनातून हा आठवडा शुभ ठरेल. कामाच्या ठिकांणी अस्वस्थ वाटू शकते. कामातील रस कमी होईल.

6. मूलांक-६

नात्यात गोड आणि कडूपणा येईल. कामाच्या ठिकाणी सतत चिंतेत राहाल. नवीन प्रकल्प तुमचे आयुष्य बदलेल. गुंतवणूकीतून फायदा होईल. वडिलांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील.

7. मूलांक-७

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नात्यात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

8. मूलांक-८

परदेशात जाणून शिक्षण घ्याल. वैवाहिक जीवनात वाद होतील. मुलांसाठी निर्णय घ्याल. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्चामुळे महिन्याचे बजेट बिघडेल.

9. मूलांक-९

गुंतवणूकीतून शुभ परिणाम मिळतील. प्रेम जीवनात नवीन विचार किंवा नवीन सुरुवात कराल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात हा आठवडा सामान्य असेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

Aloe Vera: कोरफडीचे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT