New weekly insulin injection offers relief from daily shots for diabetes patients in India saam tv
लाईफस्टाईल

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

Once Weekly Insulin Injection Launched In India For Diabetes Patients: डायबेटीजच्या रुग्णांसाठी आता आनंदाची बातमी आहे. रोज इन्सूलिन घेण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका होणार आहे. रुग्णांसाठी आता काय नवीन पर्याय उपलब्ध झालाय ? पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता सकाळ आणि संध्याकाळच्या इन्सुलिन इंजेक्शन्सपासून ते मुक्त होणार आहेत. आठवड्यातून फक्त एकदाच घेता येणारे जगातील पहिले बेसल इन्सुलिन इंजेक्शन भारतात दाखल झालंय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डॅनिश औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने गुरुवारी भारतात आपले साप्ताहिक बेसल इन्सुलिन इंजेक्शन 'अविकली' लॉन्च केले आहे. बाजारात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या दैनंदिन इन्सुलिन औषधांशी स्पर्धा करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

भारतात अंदाजे ६० लाख रुग्ण इन्सुलिन थेरपी घेतात. भविष्यात ही संख्या 90 लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या दिर्घकाळ टिकणाऱ्या इन्सूलिनचा उपयोग प्रौढांमधील टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी केला जातो. कंपनीच्या मते, हे उत्पादन वार्षिक आवश्यक इंजेक्शन्सची संख्या 365 वरून केवळ 52 पर्यंत कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्याची किंमत प्रति युनिट 3.73 रुपये आहे. इन्सुलिनच्या 70 युनिट्सच्या साप्ताहिक डोसची किंमत 261 रुपये आहे.

भारतात 10 कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर सुमारे १४ कोटी लोक प्री-डायबिटीक आहेत. कंपनीने म्हटले आहे की, इंजेक्शनची भीती, वेदनेची भीती आणि खर्चाच्या चिंतेमुळे भारतात इन्सुलिन थेरपी सुरू करण्यास सरासरी 7-9 वर्षांचा विलंब होतो. त्यामुळे उपचारापेक्षा डायबेटीज होणार नाही आणि रक्तातील साखऱ कशी वाढणार नाही? यासाठी काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

SCROLL FOR NEXT