Mundavalya Saam TV
लाईफस्टाईल

Mundavalya: लग्नात वधू आणि वराच्या डोक्याला मुंडावळ्या का बांधल्या जातात?

Wedding Mundavalya : व्हिडिओमध्ये एका तरुणीने मुंडावळ्या बांधण्यामागचं कारण शोधून काढलं आहे. लग्नामध्ये विविध विधी पार पाडले जातात. काही विधी लग्न होण्याआधी आणि काही लग्न झाल्यावर देखील होत असतात.

Ruchika Jadhav

Wedding Rituals :

प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या पद्धती आणि रीतिरिवाज पार पाडत असतात. मराठमोळ्या सर्वच लग्नात नवरा आणि नवरी दोघेही पारंपरिक दागिने घालतात. अशात वधू आणि वर दोघांच्याही कपाळाला मुंडावळ्या बांधल्या जातात. मात्र या मुंडावळ्या बांधण्याचं नेमकं कारण काय हे कदाचित कुणालाच माहिती नसेल.

@weddingghar.in या इंस्टाग्राम अकाऊंटवरवर याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने मुंडावळ्या बांधण्यामागचं कारण शोधून काढलं आहे. लग्नामध्ये विविध विधी पार पाडले जातात. काही विधी लग्न होण्याआधी आणि काही लग्न झाल्यावर देखील होत असतात.

लग्नामध्ये हळदी समारंभापासून नवरा आणि नावरीची मोठी धावपळ होते. नवरीकडे तर मेहंदी, हळदी, चुडा भरणे यासह अनेक विधी पार पडतात. त्यामुळे वधू आणि वर दोघांच्याही डोक्याचा तान वाढतो. आलेल्या प्रत्येक पहुण्याशी बोलावे लागते. सर्वांना हसत उत्तरे द्यावी लागतात. बऱ्याच लग्नामध्ये भांडणे ही होतात. नाच गाणी आणि सर्वामुळे डोकेदुखी होते.

लग्नात वधू आणि वर दोघांच्याही डोक्यावर तान येतो. यातून थोडं बरं वाटावं म्हणून कपाळाला पट्टी बंधण्याऐवजी त्यासारख्या मुंडावळ्या बांधल्या जातात. यामुळे आपल्या कपाळावर विशिष्ट दाब पडतो. दोन्ही आयब्रोमध्ये आणि कपाळाला दोन्ही बाजूला दाब पडतो. त्यामुळे डोकं दुखणं कमी होतं. तसेच याने चेहऱ्याची शोभा देखील वाढते. असं कारण या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र आणि त्यातील प्रत्येक संस्कृती ही विज्ञानाला धरून आहे हे यावरून समजते. लग्नात पार पडणाऱ्या प्रत्येक विधी आणि सोहळ्यासाठी वेगवेगळे विधी आहेत. चेहरा गोरा व्हावा म्हणून लग्न होण्याआधी नवरा आणि नवरीला हळद लावली जाते. तसेच मुंडावळ्याचे कारण देखील आता समजले आहे.

पूर्वीच्या काळी फक्त फुलांच्या मुंडावळ्या होत्या. मोगरा किंवा चाफ्याच्या मुंडावळ्या बांधल्या जात होत्या. फुलांच्या सुगंधाने मन अगदी शांत आणि प्रसन्न राहत होतं. आता फॅशन म्हणून अनेक जण मोत्यांच्या आणि विविध डिझाईन असलेल्या मुंडावळ्या बांधतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

Tsunami Warning : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरलं; आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट, भारताला किती धोका?

Actress Arrested : अभिनेत्रीने दारूच्या नशेत २१ वर्षाच्या मुलाला कारने उडवले, जागेवरच मृत्यू

SCROLL FOR NEXT