eating with phone side effects google
लाईफस्टाईल

Mobile Addiction: जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी दिला ईशारा

Screen Time: जेवताना मोबाईल किंवा रिल्स पाहण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीज आणि मेटाबॉलिज्म बिघडण्याचा धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

जेवताना फोन बघणं हा प्रत्येक व्यक्तीचा छंदच झाला आहे. माणसाला प्रत्येक कामात आणि अगदी झोपताना त्याचा मोबाईल हवा असतो. डिजिटल युगातला हा बदल तरुणाईसाठी घातक ठरणार आहे. कारण संशोधनात असं आढळलं की, जेवताना मोबाईल वापरणं किंवा टीव्ही पाहणं शरीरावर नकारात्मक परिणाम करतं. याने तुमच्या मेंदूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार बीजिंग युनिव्हर्सिटीने या विषयावर सविस्तर संशोधन केलं आहे. यावर आधारित लेख हिंदूस्तान या वेबसाईवर प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये तज्ज्ञ म्हणाले की, जेवताना मोबाईल पाहिल्याने व्यक्तीचं लक्ष अन्नाकडे न राहता स्क्रीनकडे जातं. त्यामुळे मेंदूला पोट भरल्याची नीट जाणीव होत नाही. पोट भरल्याचा संकेत देणारे हार्मोन्स व्यवस्थित रिलीज होत नाहीत आणि व्यक्ती हळूहळू गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावून घेतो. जी त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

संशोधनात असंही नमूद केलंय की, जेवताना लक्ष विचलित झालं तर अन्नाचा वास आणि चव याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे खाण्याचा आनंदही कमी होतो. याचा परिणाम असा होतो की, एखाद्या व्यक्तीला घरगुती अन्नापेक्षा प्रोसेस्ड आणि बाहेरचं जंक फूड जास्त आवडू लागतं. सतत अशी सवय राहिली तर मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम होतो आणि तब्येत हळूहळू बिघडते.

जेवताना स्क्रीन टाइम वाढल्यामुळे फक्त लठ्ठपणाचाच धोका वाढत नाही तर टाइप-2 डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. जेवताना लक्ष न लागल्यामुळे काही लोक खूप पटाटप जेवतात, तर काही जण खूप हळू खातात. या चुकीच्या सवयींमुळे डायबिटीज, किडनीशी संबंधित आजार आणि हाय ब्लडप्रेशरचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ जेवताना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Muncipal Election : कोल्हापुरात झाली महायुती, कोणता पक्ष किती जागा लढणार? सांगलीत मात्र एका कारणानं फिस्कटलं!

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट

ऐन निवडणुकीत अजित पवार 'नॉट रिचेबल'? राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT