Garlic And Ginger Paste Saam Tv
लाईफस्टाईल

Garlic And Ginger Paste : आलं-लसूण पेस्ट साठवायची आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा

भारतीय जेवणात आले आणि लसूण वापरल्याशिवाय जेवण निस्तेज राहते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Garlic And Ginger Paste : भारतीय (Indian) जेवणात आले आणि लसूण वापरल्याशिवाय जेवण निस्तेज राहते. त्यामुळे लोक जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण-आले यांचा वापर करतात. पण अनेकवेळा असे घडते की, ज्यांना घाईघाईत सर्व कामे उरकून बाहेर जावे लागते, त्यांच्यासाठी लसूण सोलून आले-लसूण पेस्ट बनवण्याचा मोठा त्रास होतो. अशा स्थितीत अनेक वेळा त्यांना आले-लसूण जेवणात वापरता येत नाही. जर तुम्हालाही रोजच्या या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची समस्या कायमची संपुष्टात येईल आणि ती जवळपास ६ महिने फ्रेशही होईल. आले-लसूण पेस्ट दीर्घकाळ साठवण्याचा एक चांगला मार्ग जाणून घ्या. (Home)

आले-लसूण पेस्ट कशी साठवायची -

१. आले-लसूण पेस्ट साठवण्यासाठी प्रथम आले सोलून त्याचे जाड तुकडे करा.

२. नंतर लसूण सोलून त्यातील कळ्या काढा.

३. त्यानंतर आलं आणि लसूण समप्रमाणात घ्या.

४. आता मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या.

५. यानंतर चमच्याच्या मदतीने ही पेस्ट बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा.

६. बर्फाचा ट्रे प्लास्टिकने गुंडाळा आणि १२ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

७. आले-लसूण पेस्ट घट्ट झाल्यावर बर्फाचे तुकडे काढा आणि प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करा.

८. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला आले-लसूण पेस्ट वापरायची असेल तेव्हा तुमच्या गरजेनुसार या चौकोनी तुकडे काढून घ्या.

९. अशा प्रकारे तुम्ही आले-लसूण पेस्ट ६ महिने साठवून ठेवू शकता.

१०. जर तुम्ही ही पेस्ट एअर टाईट डब्यात ठेवली तर ती ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवता येईल. यासाठी आले आणि लसूण पेस्टवर ३ ते ४ चमचे व्हिनेगर टाका. असे केल्याने पेस्टचा रंग किंचित बदलेल, परंतु तुम्ही ते जास्त काळ ताजे ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onkar Bhojane: 'कलाकार म्हणून उत्तम, पण माणूस म्हणून...'; ओंकार भोजनेच्या अनप्रोफेशनल वागण्यावरुन प्रसिद्ध दिग्दर्शक संतापले

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार- उद्धव ठाकरे

Ganpati Visarjan 2026 : मुंबई मेट्रोचा मोठा निर्णय! गणपती विसर्जनाला रात्रभर सुरु राहणार मेट्रो ३; प्रवाशांना दिलासा

Sugar Harmful For Skin : तुम्हाला गोड खायला खूप आवडतं? जास्त साखरेमुळे त्वचेला होतात 'या' ५ गंभीर समस्या

Hotel Rooms: हॉटेलच्या रूममध्ये खुर्ची का असते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT