Multigrain Chapati Recipe
Multigrain Chapati Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Multigrain Chapati Recipe : थंडीच्या दिवसात हेल्दी व फिट राहायचे आहे ? आहारात समावेश करा मल्टीग्रेन चपातीचा, पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Multigrain Chapati Recipe : थंडीच्या दिवसांत आपण बऱ्याचदा बाहेरचं अनहेल्दी फूड खातो. त्यामुळे आपण आजारी देखील पडतो. परंतु तुम्ही जर तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायची असेल आणि थंडीच्या या दिवसांमध्ये धडधाकट राहायचं असेल. तर तुम्ही आम्ही सांगितलेली मल्टीग्रेन रोटी बनवून पाहिलीच पाहिजे.

मल्टीग्रेन म्हणजेच अनेक धान्यांपासून बनवली गेलेली चपाती. मल्टीग्रेन पिठापासून बनवलेली चपाती आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर (Benefits) असते. मल्टीग्रेन चपाती खाऊन आपण पूर्ण दिवस एनर्जेटिक राहतो. त्याचबरोबर मल्टीग्रेन चपाती आपल्या शरीरामधील इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत करते.

मल्टीग्रेन चपातीला तुम्ही तुमच्या डाएट (Diet) प्लॅनमध्ये देखील सामील करू शकता. मल्टीग्रेन चपात्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. त्याचबरोबर न्यूट्रीएंट्स देखील असतात. अशातच मल्टीग्रेन चपाती ही अतिशय चविष्ट असते. तुम्ही रोज गव्हाच्या चपात्या खाऊन कंटाळले असाल तर, मल्टीग्रेन पिठाची चपाती नक्कीच ट्राय करा.

साहित्य -

1. गव्हाचे पीठ एक कप

2. बेसन एक कप

3. मक्याचे पीठ 1/2 कप

4. बाजरीचे पीठ 1/2 कप

5. ज्वारीचे पीठ 1/2 कप

6. साजूक तूप तीन टेबलस्पून

7. चवीनुसार मीठ.

Multigrain Chapati Recipe

मल्टीग्रेन चपाती बनवण्याची पद्धत :

  • शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असणारी मल्टीग्रेन चपाती बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीठ मळावं लागेल.

  • यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक मोठं भांड घ्यायचं आहे. त्यामध्ये गहूचे पीठ, मक्याचे पीठ, बेसन, ज्वारीचे पीठ आणि बाजरीचे पीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच आहे.

  • जेव्हा सगळे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स होतील तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एक कप बेसन टाकून मिक्स करा.

  • त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील टाका.

  • आता थोडंसं कोमट पाणी (Water) घेऊन पीठ चांगलं मऊसूत मळून घ्या.

  • पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर दहा मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटे झाल्यावर पीठ परत थोडसं मळून घ्या.

  • त्यानंतर पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. त्यानंतर एक एक गोळा घेऊन सगळ्या. आता एक नॉनस्टिक तवा गॅस वरती ठेवून मध्यम फ्लेम वरती गरम करा.

  • तवा चांगला गरम झाल्यावर तव्यावरती तूप टाकून ते पसरवून घ्या. नंतर लाटलेली एकेक चपाती तव्यावरती चांगली शेकून घ्या.

  • अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या भाजून घ्या. तयार झाली तुमची गरमागरम मल्टीग्रेन चपाती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

Men's Ethnic Wear: पुरुषांच्या पारंपारिक पोषाखांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय; शेरवाणीला मिळतेय लोकांची पसंती

Solapur Loksabha: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा; राम सातपुतेंची ताकद वाढणार?

Mohan Bhagwat News : आरक्षणावरून राहुल गांधी आणि मोहन भागवत यांच्यात जुंपली

Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

SCROLL FOR NEXT