Mosquito Problem
Mosquito Problem  Saam Tv
लाईफस्टाईल

Mosquito Problem : हिवाळ्यात डासांना पळवायचे आहे ? तर असा बनवा स्प्रे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mosquito Problem : आजकाल डासांनी दहशत निर्माण केली आहे. घरात किंवा बागेत सर्वत्र डास दिसतात. डास चावल्यामुळे खाज आणि जळजळ होते. ते केवळ चावण्याने त्रास देत नाहीत तर डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार पसरवतात. डासांना पळवून लावण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु काही वेळा हे उपाय डासांच्या दहशतीसमोर अपयशीही ठरतात. डासांपासून दूर राहण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकतो. या टिप्स खूप प्रभावी आहेत, जे डासांना (Mosquito) लवकर दूर पळवून लावतात आणि रोगांपासून (Disease) आपले संरक्षण करतात.

लसूण स्प्रे -

आपण लसणाच्या साहाय्याने डासांपासून बचाव करणारा स्प्रे बनवू शकतो. स्प्रे करण्यासाठी, लसणाच्या कळ्या बारीक करा आणि पेस्ट पाण्यात उकळा. ते थंड झाल्यावर हे पाणी बाटलीत भरून डास असलेल्या ठिकाणी जसे की कोपऱ्यात, पडद्याच्या मागे किंवा पलंगाखाली शिंपडा. लसणाच्या वासामुळे डास दूर होतात. एवढेच नाही तर लसणाचा रस प्यायल्याने डासही मरतात.

पेपरमिंट तेल -

पुदीना डासांना दूर करण्यासाठी प्रभावी आहे, म्हणूनच पुदिन्याचा वापर अनेक डासांपासून बचाव करणाऱ्या फवारण्यांमध्ये केला जातो. डासांना घालवण्यासाठी पुदिन्याचे तेल घरात शिंपडले जाऊ शकते. पुदिन्याची पाने कोपऱ्यात ठेवल्यानेही डास दूर राहतील.

लिंबू आणि लवंग -

लिंबू आणि लवंगाच्या वासाने डास पळून जातात. डासांना घालवण्यासाठी लिंबूमध्ये लवंग टाका, डास दूर राहतील. हे लिंबू आणि लवंग घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. लिंबू आणि लवंग खिडकीत, पडद्यामागे,

फ्रीजच्या वर, डस्टबिनजवळ आणि घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने डास पळून जातील. लिंबाने घरातही ताजेपणा राहील.

कापूरचा वास -

डासांना कापूरच्या वासापासून दूर राहणे आवडते. डासांना घालवायचे असेल तर घरात कापूर जाळावा. यामुळे डास मुळापासूनच नष्ट होतील. कापूर पाण्यात ठेवल्याने त्याचा सुगंधही पसरतो ज्यामुळे डास घरात प्रवेश करू शकत नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sharad Pawar: भारी गडी दिसतोय, लक्ष ठेवलं पाहिजे.. शरद पवारांनी सांगितला 'आर.आर.आबांच्या' राजकीय एन्ट्रीचा किस्सा!

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

SCROLL FOR NEXT