Skin Brightening Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Brightening Tips : काही मिनिटांत चेहरा ग्लो करायचा आहे ? फॉलो करा 'या' टिप्स

बदलते हवामान आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आपली त्वचा निस्तेज बनली आहे.

कोमल दामुद्रे

Skin Brightening Tips : प्रत्येकाला असे वाटते की आपण सुंदर दिसावे. त्याचबरोबर आपला चेहरा क्लीन अँड क्लिअर असावा हे अनेकांचं स्वप्न असते. महिलांना असे वाटते की, आपला चेहरा हिरोइनसारखा दिसावा.

बदलते हवामान आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आपली त्वचा निस्तेज बनली आहे. बरोबर आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन सी हे तत्व खूप महत्त्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम दूर निघून जातील.

व्हिटॅमिन (Vitamins) सीच्या पावडरमुळे तुमच्या त्वचेला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. व्हिटॅमिन सीच्या पावडरमध्ये या गोष्टी मिसळवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील तेज पुन्हा आणू शकता. व्हिटॅमिन सीच्या पावडरच्या वापरामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

1. मध आणि व्हिटॅमिन सी :

मध हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. अशातच तुम्ही विटामिन सीची पावडर मधामध्ये मिसळवून त्वचेवरती लावू शकता. याच्या वापराने त्वचे संबंधिच्या अनेक समस्या दूर निघून जातात. यासाठी तुम्हाला एक चमचा व्हिटॅमिन सी पावडर आणि एक चमचा मध घेऊन मिक्स करायचे आहे. हे मिश्रण चेहऱ्यावरती लावून 20 मिनिटानंतर चेहरा (Skin) स्वच्छ पाण्याने (Water) धुवून काढायचा आहे.

Skin Brightening Tips

2. एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन सी :

एलोवेरा जेल हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. चेहऱ्यावरील काळे डाग, त्याचबरोबर पिंपल यांसारखे अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. अशातच तुम्ही व्हिटॅमिन सी आणि एलोवेरा जेल या दोघांचा वापर करून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये व्हिटॅमिन सीची पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये गरजेपुरत एलोवेरा जेल घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चेहऱ्याला लावून वेळानंतर धुवून टाकायच आहे. असं केल्याने तुमचा चेहरा साफसूत्रा होईल.

3. ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन सी :

ग्लिसरीन सोबत व्हिटॅमिन सीची पावडर वापरून तुम्ही तुमच्या त्वचे संबंधित समस्यांना दूर करू शकता. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये एक चमचा ग्लिसरीन घेऊन त्यामध्ये गरजेपुरती व्हिटॅमिन सीची पावडर घ्यायची आहे. नंतरला हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायच आहे. वीस मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. हे उपाय वापरून तुम्ही तुमची त्वचा उजळवू शकता. त्याचबरोबर त्वचेची काळजी घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT