Skin Care Tips : उन्हामुळे त्वचा खराब होते ? तर 'या' घरगुती फेस पॅकचा वापर करा

महागड्या प्रॉडक्टचा वापर करूनही या समस्या पासून आराम मिळत नाही.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv
Published On

Skin Care Tips : उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो पण तरीही तुम्हाला त्वचेच्या समस्या येतच राहतात.

महागड्या प्रॉडक्टचा वापर करूनही या समस्या पासून आराम मिळत नाही. त्यामुळे आता घरगुती फेसपॅकचा वापर करून पहा तुम्हाच्या त्वचेच्या समस्या दूर होतील आणि आराम मिळेल.चला तर मग जाणून घेऊया काही घरगुती फेसपॅक बद्दल.

Skin Care Tips
Skin Care Tips : तुम्ही चेहऱ्यासाठी बॉडी लोशनचा वापर करताय? वेळीच थांबा, अन्यथा त्वचेला होईल अधिक नुकसान

1. तांदळाचा (Rice) फेस पॅक

तांदळाचे पीठ अगोदर तयार करून घ्या. एका वाटीत एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा मध घ्या. आता त्यात तांदळाचे पीठ टाकून छान पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट आता चेहऱ्याला लावून दहा-पंधरा मिनिटांनी पाण्याने (Water) धुऊन घ्या.

Skin care tips
Skin care tips canva

2. पपई फेस पॅक

हा पॅक बनवण्यासाठी पपईचा पल्प मॅश करून घ्या. आता त्यात एक संत्री चा रस काढून हे दोन्ही गोष्टी एकजीव करून घ्या आणि हे तयार झालेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. दहा पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्या.

3. बेसन फेस पॅक

एका भांड्यात एक चमचा बेसन घेऊन त्यात कच्चे दूध (Milk) मिक्स करून घ्या. आता हे तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा साधारणपणे पंधरा मिनिटं चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर तुमचा चेहरा (Skin) स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

4. दहीचा वापर

चेहऱ्यावर दह्याने मसाज करा आणि काही वेळाने चेहरा धुवून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या याचा वापर केल्याने तुम्हाला टॅनिंगच्या समस्येपासून आराम मिळेल.

Skin Care Tips
Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? 'या' पदार्थांचा समावेश करा, त्वचा राहील टवटवीत

5. बटाट्याचा (Potatoes) फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुऊन किसून घ्या आणि आता त्यात लिंबाचा रस घाला. हे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा पंधरा मिनिटे झाल्याने पाण्याने स्वच्छ धुवा.

Skin care Tips
Skin care Tipscanva

6. एलोवेरा जेलचा वापर

तुम्ही तुमच्या रोजच्या नियमित रुटीनमध्ये स्किन केअर म्हणून एलोवेरा जेलचा समावेश करू शकता. सनबर्न पासून आराम मिळवण्याचा हा एक सोपा पर्याय आहे हा तुम्ही सहज फॉलो करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com