Summer Healthy Recipe
Summer Healthy Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Healthy Recipe : उन्हाळ्यात पाचनशक्ती स्ट्रॉग बनवायची आहे ? मग नाश्त्यात ट्राय करा ओट्स इडली, पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Oats Idli Recipe : उन्हाळाच्या ऋतूमध्ये सतत तहान लागते. या ऋतूमध्ये शरीरात डिहायड्रेशन आणि पचनसंस्थेच्या समस्या जास्तीत जास्त असतात. दर दहापैकी दोन ते तीन जण या समस्येने नक्कीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत या ऋतूत आरोग्यदायी अन्न खाणे खूप गरजेचे आहे.

विशेषत: दिवसाच्या सुरुवातीला जर नाश्ता आरोग्यदायी (Healthy) असेल तर या समस्येवर बऱ्याच अंशी मात करता येते. तसे, उन्हाळ्याच्या हंगामात अनेकांना जास्त खाण्यातही त्रास होतो. अशा परिस्थितीत, नाश्ता योग्य असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याची रेसिपी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया पचायला हलकी व आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) असणारी ओट्स इडलीची रेसिपी.

1. साहित्य

  • ओट्स - 2 कप

  • दही - 3 कप

  • मोहरी - 1 चमचा

  • उडीद डाळ - 2 चमचे

  • हळद (Turmeric) - 1/2 टीस्पून

  • हिरवी मिरची - 2 बारीक चिरलेली

  • तेल - 2 चमचे

  • मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर - 1 टीस्पून

  • गाजर - 1 किसलेले

2. कृती

  • सर्व प्रथम एका पातेल्यात ओट्स घालून भाजून घ्या आणि भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा.

  • इथे दुसर्‍या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि उडीद डाळ टाका आणि तपकिरी होईपर्यंत तळा.

  • आता त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, गाजर आणि हळद घालून साधारण ५ मिनिटे शिजवा.

  • ५ मिनिटांनंतर दही सोबत ओट्स पावडर घालून थोडा वेळ शिजवा.

  • थोडा वेळ शिजल्यानंतर हे मिश्रण इडलीच्या साच्यात टाका आणि वाफेवर 10 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा.

  • चविष्ट आणि आरोग्यदायी ओट्स इडली नाश्त्यासाठी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

SCROLL FOR NEXT