नवीन वर्ष म्हणजे एक नवी सुरुवात आणि या दिवशी खास करून हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काही सोपं पण प्रभावी बदल केले पाहिजेत. भविष्यातील अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. २०२६ मध्ये निरोगी हृदयासाठी हे ५ संकल्प नक्की केले पाहिजेत. दिवसेंदिवस तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
२०२५ मध्ये हृदयविकार ही सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेहाशी संबंधित हृदयाच्या समस्या आणि अचानक हृदयविकाराचे झटके हे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. वाढता ताणतणाव आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांचा हृदयावर विपरीत परिणाम होत आहे.
सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ. बिपिनचंद्र भामरे म्हणाले की, अनेक तरुणांना हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता, ब्लॉकेजेस आणि लठ्ठपणामुळे अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. आपण २०२६ मध्ये प्रवेश करत असताना, नवीन वर्ष ही एक नवीन सुरुवात करण्याची आणि साधे, व्यावहारिक बदल करण्याची उत्तम संधी देते, जे तुमच्या हृदयाला मजबूत करतील आणि संपूर्ण आरोग्य सुधारेल. त्यामुळे, हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब, धमन्यांमधील अडथळे, हृदयविकाराचा झटका, अनियमित हृदयाचे ठोके, हृदय निकामी होणे आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या रुग्णाच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात.
२५ ते ७५ वयोगटातील लोकांना छातीत अस्वस्थता, चालताना धाप लागणं, सतत थकवा येणं, पायांना सूज येणं, चक्कर येणं, ॲसिडिटी, छातीत दुखणं किंवा हृदयाचे ठोके वाढणं यांसारख्या समस्या येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा गंभीर गुंतागुंत होते, ज्यात हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदयाचे कायमचे नुकसान किंवा अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा समावेश आहे. तरुण प्रौढांमध्ये हृदयविकारांचं वाढतं प्रमाण ही देखील चिंताजनक बाब आहे, कारण वेळीच जीवनशैलीत बदल न केल्यास ब्लॉकेजेस वाढू शकतात.
चालणं, सायकलिंग, योग किंवा साधे घरगुती व्यायाम यांसारखे व्यायाम कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. दिवसातून किमान ४५ मिनिटे व्यायाम करा.
आहारात भरपूर फळं, भाज्या, तृणधान्य, सुका मेवा आणि फायबरयुक्त प्रोटीनचा समावेश करा. तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि अतिरिक्त मीठाचे सेवन कमी करा.
पुरेशी झोप न मिळाल्यास तणावाचे हार्मोन्स वाढतात आणि रक्तदाबाचा धोका वाढतो. वेळेत झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. झोपेची दिनचर्या पाळा आणि हृदय निरोगी ठेवा.
२०२५ हे वर्ष हृदयासाठी तणावपूर्ण ठरले असेल. नवीन वर्ष म्हणजेच २०२६ मध्ये, तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, ध्यानधारणा करा, चित्रकला, बागकाम किंवा नवीन कला शिका किंवा कामाच्या वेळेत लहान ब्रेक्स घ्या.
२०२६ मध्ये, हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. रक्त तपासणी, ईसीजी केल्यास सुरुवातीच्या समस्या वेळीच ओळखता येतात आणि त्वरित उपचार सुरू करण्यास मदत होते. ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा ज्यांच्या कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास आहे, त्यांच्यासाठी दर सहा महिन्यांनी वार्षिक तपासणी करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.