Garlic Chutney Recipe
Garlic Chutney Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Garlic Chutney Recipe : लसणाची लाल चटणी महिनाभर टिकवायची आहे ? या सोप्या टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

Garlic Chutney : जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला हमखास लोणचे किंवा चटणी हा पदार्थ वाढला जातो. हल्ली लोणची, चटणी बाजारात सहज मिळतात. परंतु, पावसाच्या वेळी किंवा आपल्या अधिक काळासाठी चटणीची साठवण करायची असेल तर काय कराल ?

राजस्थानमध्ये लसणाची (Garlic) लाल चटणी ही बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. यासोबतच तिला भजी, पराठ्यासोबतही खाल्ली जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते. भारतातील अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने चटणी (Chutney) तयार केली जाते. पण जर तुम्हाला देखील ही चटणी तयार करायची असेल व महिनाभर टिकवायची असेल तर कसे कराल जाणून घ्या

1. साहित्य

  • कश्मिरी लाल मिर्ची - ६

  • लाल मिर्ची - ५

  • लसूण - २० ते २५ पाकळ्या

  • तेल (Oil) - ४ मोठे चमचे

  • लिंबाचा रस - अर्धा चमचा

  • मीठ - स्वादानुसार

  • पाणी- १ कप

2. कृती

  • काश्मिरी लाल मिरच्या आणि लाल गरम मिरच्या एका भांड्यात घालून, एक वाटी पाणी घालून कमी प्रमाणात उकळी येईपर्यंत शिजवून घ्या.

  • उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड करुन घ्या. यानंतर मिरच्या मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट बनवा.

  • आता एका कढईत तेल घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला आणि 30 सेकंद शिजवा.

  • यानंतर लाल मिरचीची पेस्ट घाला आणि 5 मिनिटे ढवळत असताना शिजवा.

  • नंतर गॅस बंद करून मीठ आणि लिंबाचा रस घाला.

  • चटणी तयार झाल्यानंतर थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये १ महिना साठवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

Hingoli Water Crisis | Saam Tv च्या बातमीमुळे काय झालं बघाच!

Sanjay Raut | "त्यांनाच शिंदे नको होते.." राऊतांनी नावं घेत सगळंच सांगितलं..

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

SCROLL FOR NEXT