Flaxseeds Paratha Recipe : नाश्त्यात बनवा हेल्दी व पौष्टिक असा अळशीचा पराठा, उच्च रक्तदाब राहिल नियंत्रणात!

flaxseed Paratha : वजन कमी करणे व उच्च रक्तदाबावर अळशीचा पराठा फायदेशीर आहे.
Breakfast Idea
Breakfast IdeaSaam tv

How To Make Flaxseeds Paratha : सकाळचा हेल्थी व पौष्टिक असा नाश्ता बनवताना आपल्या अनेक प्रश्न पडतात. झटपट व आरोग्यदायी असे काय बनेल हा आपल्याला दिवस-रात्र सतावतो. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास रेसिपी आणली आहे.

अळशीमध्ये (Flaxseeds) अधिक प्रमाणात प्रथिने व ओमेगा-3 सारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. म्हणूनच त्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच लोक अळशी भाजून किंवा ताटात टाकल्यावर खातात. पण तुम्ही कधी अळशीचा पराठा खाल्ला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अळशीचा पराठा बनवण्याची रेसिपी (Recipe) घेऊन आलो आहोत.

Breakfast Idea
Ragi Barfi Recipe : तुम्हालाही मधुमेह आहे ? गोड खाऊ शकत नाही, मग ही नाचणीची बर्फी नक्की करुन पाहा

अळशीचा पराठा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून दूर राहता येते. फ्लॅक्ससीड तुमची रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. म्हणून हा पराठा चवदार आणि पौष्टिकही असतो. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा अळशीचा पराठा

1. साहित्य

  • गव्हाचे पीठ १/२ कप

  • जिरे १/२ टीस्पून

  • मीठ चवीनुसार

  • अळशी १ मोठा टेबलस्पून

  • ओट्स १/२ कप

  • तूप आवश्यकतेनुसार

  • पाणी (Water)

Breakfast Idea
Jaggery Sharbat Recipe: उन्हाळ्यात पोटाच्या अनेक विकारांवर ठरेल रामबाण गुळाचे सरबत, पाहा रेसिपी

2. कृती

  • अळशीचा पराठा बनवण्यासाठी सर्व प्रथम परातीत पीठ घ्या.

  • नंतर त्यात जिरे, मीठ, अळशीची पेस्ट आणि ओट्स घालून मिक्स करा.

  • यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्या.

  • नंतर त्यात थोडं तेल टाका आणि नीट मिसळा आणि सेट करण्यासाठी बाजूला ठेवा.

  • यानंतर नॉनस्टिक पॅनला तेल आणि तुपाने ग्रीस करा.

  • नंतर पिठाचा गोळा तयार करून पराठ्यासारखा लाटून गरम तव्यावर ठेवा.

  • यानंतर दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठा सोनेरी होईपर्यंत बेक करा.

  • आता तुमचा चविष्ट आणि हेल्दी अळशीचा पराठा तयार आहे.

  • नंतर हिरवी चटणी, दही किंवा चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com