Shahi Sweet Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Shahi Sweet Recipe : गोड खायची इच्छा झालीये ? फक्त पंधरा मिनिटांत तयार करा शाही स्विट, पाहा रेसिपी

जेवणानंतर कुठलाही गोड पदार्थ खाताना अतिशय चविष्ट लागतो.

कोमल दामुद्रे

Shahi Sweet Recipe : कोणत्याही सण असो किंवा समारंभ असो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर आपल्या प्रत्येकाला गोड खायला आवडते. जेवणानंतर कुठलाही गोड पदार्थ खाताना अतिशय चविष्ट लागतो. त्याचबरोबर घरामध्ये अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ करतो.

प्रत्येक वेळेला घरामध्ये मिठाई उपलब्ध असणे गरजेचे नाही आहे. ज्या लोकांना गोड खायला भरपूर आवडते. ते लोक कोणत्या ना कोणत्या मिठाईच्या शोधामध्ये नक्कीच असतात. परंतु घरामध्ये मिठाई स्टोअर करून ठेवणे कठीण होऊन जाते. तुम्हाला रात्री अचानक गोड खावसं वाटलं किंवा अचानक घरी पाहुणे आले तर , त्यांना खाण्यासाठी गोड पदार्थ देण्यास कठीण परिस्थिती निर्माण होते. अशा तसाच आम्ही तुम्हाला अशा या काही गोड रेसिपी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही त्या रेसिपी घरी बनवून खाऊ शकतात. त्याचबरोबर घरी (Home) आलेल्या पाहुण्यांसाठी कमी वेळात (Time) स्वादिष्ट रेसिपी बनवू शकाल.

1. शाही पीस : शाही पीस ही रेसिपी तुम्ही फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार करू शकता. ही रेसिपी बनवणे जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला सुद्धा उत्तम आहे. रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री कोणती हे जाणून घेऊया

शाही पीसची सामग्री : ब्रेडचे स्लाईस, दूध (Milk), साखर, तूप, गार्निश करण्यासाठी खवा आणि नारळाचा किस आणि ड्रायफूट.

शाही पीस बनवण्याची पद्धत :

  • शाही पीस बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवा.

  • त्यानंतर तव्यामध्ये एक चमचा तूप टाकून ब्रेडचे स्लाईस सोनेरी रंगांचे होईपर्यंत करून घ्या.

  • त्यानंतर ब्रेड स्लाईस काय होईपर्यंत. दुसऱ्या पॅनमध्ये दूध टाकून उकळवून घ्या. त्यानंतर दुधामध्ये साखर टाकून उद्घाटन होईपर्यंत शिजवा.

  • आता एका प्लेटमध्ये फ्राय ब्रेडची स्लाईस ठेवून ब्रेडच्या वरती शिजवलेलं दूध टाका.

  • त्यानंतर ब्रेडच्या वरून थोडा खवा, नारळाचा चुरा, आणि ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करा.

2. नारळाची बर्फी : घरामध्ये सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये तयार होणारी नारळाची बर्फी(Coconut barfi) सर्वांनाच आवडते. यासाठी जास्त सामग्री नाही लागत. नारळाची बर्फी बनवण्यासाठी किसलेला नारळ, साखर, वेलची, ड्रायफ्रूट्स, खवा, साजूक तूप. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते.

Coconut barfi

कृती :

  • नारळाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये साजूक तूप टाकून गरम करून घ्या.

  • त्यानंतर तुपामध्ये मावा टाकून हलकं परतून घ्या.

  • आता या माव्यामध्ये वेलची, साखर, खवा आणि किसलेला नारळ टाकून परतून घ्या.

  • जेव्हा साखर (Sugar) या मिश्रणामध्ये पूर्णपणे एकजीव होईल तेव्हा सगळे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून वरून बदामाचे काप टाका.

  • त्यानंतर बर्फीच्या शेपमध्ये कापून थंड होईपर्यंत तसंच ठेवून द्या. तयार झाली नारळाची चविष्ट बर्फी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT