Home base business for women, Business idea, women life ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Home Based business for ladies : घरगुती व्यवसाय करायचा आहे ? जाणून कोणत्या व्यवसायात मिळेल अधिक फायदा

महिलांना कोणत्या व्यवसाय मिळेल अधिक फायदा ?

कोमल दामुद्रे

मुंबई : शहरी किंवा गावाच्या भागात काही अशा महिला असतात ज्यांना लग्न झाल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतर घराबाहेर काम करता येत नाही. त्याच्या काही व्यक्तीत कारणांमुळे अशा महिला घरीच बसून असतात.

हे देखील पहा -

काही महिलांना स्वत:चा व्यवसाय करायचा असतो परंतु, कोणत्या व्यवसायात अधिक फायदा मिळेल याविषयी त्यांना अधिक ज्ञान नसते त्यासाठी आज आपण त्यांना अशा काही व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे त्यांना व्यवसायही करता येईल व पैसे देखील कमावता येतील. जाणून घेऊया अशा काही व्यवसायांबद्दल.

१. जर आपल्याला कम्प्युटर किंवा तंत्रज्ञानाबद्दल विशेष माहिती असेल तर आपण घर बसल्या ऑनलाइन व्यवसाय करु शकतो. आपण घरी बसल्या रेल्वे, बस किंवा विमान बूकिंगचा व्यवसाय करुन पैसे कमावू शकतो. तसेच विविध प्रकारचे बिलचे पेमेंट करु शकतो.

२. आपल्या घरी बसून काम करायचे असेल तर आपण वेब डिझायनिंगचा कोर्स करु शकतो. यात विविध कंपन्या आपल्या वेबसाइट बनवून घेतात ज्याच्या आपल्या फायदा होऊ शकतो.

३. सध्या नेटवर्किंगच्या युगात आपल्याला स्वत:चे काही तरी करण्याची इच्छा असते. आपण स्वत:ची वेबसाइट ओपन करुन ऑनलाइन व्यवसाय करु शकतो किंवा काही जाहिरात दाखवून पैसे कमावू शकतो. तसेच त्यात महिला किंवा लहान मुलांच्या संबधित काही गोष्टींची आपण विक्री करु शकतो.

४. तसेच आपण काही घरगुती क्लासेस् घेऊ शकतो. आपल्या ज्या क्षेत्रात विशेष आवड आहे त्या क्षेत्रासंबंधित आपण क्लासेस् घेऊन पैसे कमाऊ शकतो.

५. शहरी भागात काही महिला या नोकरी करतात त्यामुळे त्यांना मुलांना (Child) सांभळता येत नाही. त्यासाठी त्या पाळणाघर शोधत असतात. अशावेळी आपण पाळणाघर ओपन करुन पैसे कमाऊ शकतो.

६. आपण होलसेल मार्केटमधून विशिष्ट गोष्टींची खरेदी (Shopping) करुन आपण ती आपल्या ओळखीच्या व जवळपासच्या महिलांना तो माल विकू शकतो. त्यामुळे देखील आपल्याला पैसे कमावता येऊ शकतात.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT