Most Dangerous Trek Saam Tv
लाईफस्टाईल

Most Dangerous Trek : ट्रेकिंगचा थरारक अनुभव हवाय? तर हरिहर गडावर नक्की भेट द्या

Monsoon Trek : पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. अनेकजण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी जाण्यासाठी जात असतात. त्यात जर तुम्हाला ट्रेकिंगचा थरारक अनुभव हवाय?तर या ठिकाणी नक्की जावा.

Aarti Ingle

हरिहर गड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १९९६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा गडसुद्धा जिंकला. महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक गड म्हणून हरिहर ओळखला जातो.

महाराष्ट्रात अनेक गड-किल्ले आहेत. मात्र हरिहर हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा गड आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर(trimbkeshwar) इथे असलेला हरिहर हा गड सर्वात लोकप्रिय आणि थरारक गड आहे. फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा थरारक अनुभव घ्यायची इच्छा ज्या गिर्यारोहकांना असेल त्यांनीच या गडावर भेट द्यावी. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून या गडावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या गडाला 'हर्षगड' असेही म्हणतात. हरिहर गड चढण्यासाठी साधारणपणे दिड ते दोन तास लागतात. या गडावर दगडी पायऱ्या खडकात कोरलेल्या आहेत. त्यामुळे चढताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर गडावर जायचा प्लॅन आहात तर ही माहिती तुमच्यासाठी.

१) हरिहर गडावर कसे जायचे?

हर्षेवाडी

मुंबईतून हरिहर गडावर जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी या गावातून तुम्ही जाऊ शकता. मुंबईतील CSMT स्थानकातून नाशिकला जाण्यासाठी ट्रेन पकडावी. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात उतरून खाजगी वाहनाने हर्षेवाडीला जाता येते. हा गडावर जाण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आहे.

निरगुरपाडा

मुंबईच्या दादर(Dader) रेल्वेस्थानकाहून कसारा जाण्यासाठी ट्रेन पकडा. कसारा येथून खाजगी वाहनाने निरगुरपाडा गावात उतरा. तिकडून हरिहर गडावर जाता येते. निरगुरपाडा गावातून हरिहर गडावर जाण्यासाठीचा सर्वात आव्हानात्मक मार्ग आहे. निरगुरपाडा गावातून गडावर जाण्यासाठी अडिच तास लागतात. अनुभवी गिर्यारोकांनीच येथून जावे.

२) गडावर राहण्याची सोय

हरिहर गडावर राहण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे तुम्ही गडावर तंबू ठोकून राहू शकता. हरिहर गडाच्या माथ्यावर तंबू ठोकायला जागा नाही त्यामुळे पायऱ्या सुरू होण्यापूर्वीच तुम्ही तंबू ठोकून राहू शकता. तसेच गाव जवळ असल्यामुळे जेवण आणि पाण्याचीही सोय होते.

३) गडावर काय बघाल?

हरिहर गडावर वरती गेल्यानंतर महादरवाजा हा एक मुख्य दरवाजा असून तो अतिशय जुना दरवाजा आहे. गडाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर पर्यटकांना हनुमान आणि भगवान शंकराची अनेक छोटी मंदिरे देखील दिसतात.

- शिखरावर गेल्यावर सह्याद्री पर्वतरांगा पाहण्यासारखे आहे. या ठिकाणाहून महाराष्ट्रातील(Maharashtra)गडांचे निरीक्षण केल्याने तुम्ही एका वेगळ्याच विश्वात हरवून जाल.

- गडावर शंकर आणि नंदीची मूर्ती आहे. मूर्तींच्या समोर एक तलावही आहे. तसेच या जागेवरून तुम्हाला ब्रह्मा पर्वत दिसेल.

- भास्करगड, अंजनेरी किल्ला आणि अनेक किल्ले गडाच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे ते पाहताना एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल.

४) गडावर काय काळजी घ्यावी?

- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हरिहर गडावर खूप माकडे (monkey)आहेत. त्यामुळे पायऱ्यांनी वर जाताना माकडे अंगावर येऊ शकतात. त्यामुळे तुमचा फोन अथवा इतर वस्तू गडावर जाताना बॅगेतून बाहेर काढू नका. खाण्याची कोणतीही वस्तू दिसेल अशी ठेऊ नका.

- गडावर ट्रेक करणे खूप अवघड आहे त्यामुळे ज्यांना उंचावर जाण्याचा फोबिया असेल त्यांनी हरिहरवर जाऊ नये.

- खूप घट्ट कपडे घालू नका आणि शूज चांगले घाला. आणि महत्त्वाचे म्हणजे गडावर चढताना सतत पाणी पिऊ नका त्यामुळे तुमच्या पोटात दुखेल. मात्र ट्रेकिंग स्नॅक्स आणि पाणी सोबत ठेवा, तसेच Glucon-D सोबत असू द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT