Fat Wallet Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Fat Wallet Disease : पुरुषांच्या 'या' चूकीमुळे जडू शकतो भयंकर आजार, चालण्या-फिरतानाही होईल त्रास !

Big Wallet in Back Pocket : अनेक पुरुष त्यांचं पैशाचं पाकीट ठेवण्यासठी जीन्सच्या मागचा खिसा वापरतात. परंतु ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.

कोमल दामुद्रे

Men Health Care : अनेक पुरुष त्यांचं पैशाचं पाकीट ठेवण्यासठी जीन्सच्या मागचा खिसा वापरतात. परंतु ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. अनेक तास पैशांचा पाकीट मागील खिशामध्ये ठेवल्याने फॅट वॉलेट सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. या आजारामध्ये तुमचे चालणे फिरणे कठीण होऊन जाईल.

पर्स ठेवण्यासाठी जीन्सच्या मागच्या खिशाचा वापर करणे ही पुरुषांमध्ये अतिशय सामान्य गोष्ट आहे. परंतु ही सवय अत्यंत वाईट आहे. या सवयीमुळे तुम्ही गंभीर आजारांचे (Disease) शिकार होऊ शकता. यामुळे तुमचे चालणे फिरणे, उठणे बसणे कठीण होऊन जाते.

हैदराबाद येथे राहणाऱ्या तीस वर्षीय व्यक्तीला एक आजार जडला आहे. सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी नसेची गोष्ट म्हणून सोडून दिली. परंतु दिवसेंदिवस त्यांच दुखणं वाढत गेलं. त्यांना तीन महिने डाव्या नितंबपासून पाय आणि पंज्यापर्यंत दुखत होतं. त्यावरती अनेक ट्रीटमेंट केल्या सुद्धा ते बरे होत नव्हते. त्यानंतर डॉक्टरकडे जाऊन तपासल्यावर एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे त्यांना फॅट वॉलेट सिंड्रोम झाले आहे.

1. 'फॅट वॉलेट सिंड्रोम' म्हणजे काय ?

फॅट वॉलेट सिंड्रोमने पीडित असलेल्या व्यक्तीला उभे राहण्यास आणि बसून खाली झोपण्यास जास्त दुखणे सहन करावे लागते. त्या व्यक्तीला एमआरआई सारख्या अनेक प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात. ज्यामध्ये पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागाच्या तक्रारी दिसून येतात.

2. फॅट वॉलेट सिंड्रोम ठरू शकतो अत्यंत खतरनाक :

डॉक्टरांना अशी माहिती मिळाली की पैशांच्या वजनदार पर्समुळे व्यक्तीचे पिरी पीरीफोर्मिस मसल्स दबले जातात. त्यामुळे रिढच्या हड्डीपर्यंत जाणारी सायटिका नस सुद्धा दबली जाते. फॅट वॉलेट सिंड्रोम झाल्यावर पीडित व्यक्तीच्या सरळ सायटिका नसेवर दबाव पडू शकतो. त्याचबरोबर त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागू शकतो.

3. का होते ही समस्या ?

  • नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट आणि सीनियर कन्सल्टंट डॉक्टर डॉक्टर पी.एन. रेनजेन सांगतात की, अनेक पुरुष (Mens) आपल्या वॉलेटमध्ये पैशांपेक्षा जास्त कामकाजाचे कागद, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यांसारख्या गोष्टी ठेवतात.

  • या सगळ्या वस्तूंमुळे त्यांचे पर्स वजणदार होते. यामुळे त्यांना फॅट वॉलेट सिंड्रोम होण्याचा खतरा वाढू शकतो. फॅट वॉलेट सिंड्रोमला मेडिकलच्या भाषेमध्ये पीरीफोर्मिस सिंड्रोम म्हटले जाते.

  • ही एक साइटिक तंत्रिकांसोबत संबंधित असलेली एक डिसऑर्डर आहे.

  • सायटिका ही एक नस असते जी माकड हाडापासून येऊन पायाच्या टाचेपर्यंत जोडलेली असते.

  • पीरीफोर्मिस अशा लोकांमध्ये होणे सामान्य आहे.

  • ज्यांना कामाच्या ठिकाणी स्वतःची सगळी कागदपत्रे घेऊन जावे लागते.

  • बऱ्याचदा लांबचा प्रवास करणारे यात्री, कार चालवणारे ट्रक ड्रायव्हर हे सुद्धा आपल्या पॅन्टच्या मागील खिशामध्ये पैशांचे (Money) पाकीट ठेवतात.

  • यांना सुद्धा ही समस्या होण्याची शक्यता आहे.

Men Health Tips

4. मागील खिशामध्ये पैशांचे पाकीट ठेवण्यापासून का वाचलं पाहिजे :

वास्तवमध्ये पाठीमागे पाकीट ठेवणे ही काही मोठी गोष्ट नाही. परंतु तुम्ही सतत करत असाल तर, तुमच्या बॉडीचा बॅलन्स बिघडू शकतो आणि कंबर, हिप्सवरती प्रेशर येऊ शकतो. कारण की कमरेपासूनच कुल्ह्याची सायटिका नस पास होते. त्यामुळे दबाव पडल्यावर तुम्हाला कमरेमध्ये जास्त दुखते.

5. सिंड्रोम वरती उपाय काय ?

  • फॅट वॉलेट सिंड्रोम एक गंभीर आजार बनू शकतो. वेळीच त्यावर उपचार करणे अतिशय गरजेचे आहे.

  • यावरती पी. एन . रेनजेन म्हणतात की, सायटिक रिढची हड्डी आणि कमरेच्या नसांना जोडलेली असते आणि पायापर्यंत पोहोचलेली असते.

  • म्हणूनच तुमच्या पायांचे संतुलन बनू शकते.

  • परंतु यामध्ये कोणती समस्या असेल तर, तुमच्या पण ज्यांना काम करताना निर्माण होऊ शकतो.

  • डॉक्टर पी .एन. रेनजेन यांनी सांगितले की, तुमचे पर्स तुम्ही पॅन्टच्या मागच्या खिशामध्ये ठेवू नका.

  • असाच जो व्यक्ती आपले पाकीट आदिल खिशामध्ये ठेवतो त्याला सिंड्रोम हा आजार होऊ शकतो.

  • जर कोणाला हा आजार झाला तर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित व्यक्तीला नर्व कंडिशनद्वारे चेक केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलगा नाही म्हणून अमानुष छळ; अखेर विवाहित महिलेने संपवली जीवनयात्रा, नवरा-सासऱ्याला अटक

Maharashtra News Live Update: पुण्यातील १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

Aadhaar Card मध्ये नाव, पत्ता बदलण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? जाणून घ्या नियम

Crime News : दुहेरी हत्याकांडातील साक्षीदार; महाराष्ट्रातून अपहरण, शेजारच्या राज्यात नेऊन हत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवासी बसला इंधन टँकरची धडक; अपघातानंतर भडका उडाला, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT