Maharashtra News Live Update: माऊलींचा पालखीचा पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्र आणि देशातील राजकीय घडामोडी जाणून घ्या. राज्यातील हवामान स्थिती, अवकाळी पावासाची बातमी आणि महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Published On

Pune: माऊलींचा पालखीचा पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम

पुणे -

माऊलींचा पालखीचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम.

भवानी पेठ पालखी विठोबा मंदिरातील मुक्काम आणि सोहळ्याच्या कार्यक्रम तक्ता 13 मे ला आळंदीला जाहीर करणार.

पालखी सोहळ्यातील वारकरी आणि दर्शनासाठी चा भाविक केंद्रबिंदू मानून पालखी विठोबा मंदिरातील दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत प्रशासनाकडून लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच एकादशीच्या दिवशी (ता. 13 मे )आळंदी मध्ये पालखी सोहळा दिंडी समाज संघटना, फडकरी मानकरी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.

बैठकीनंतर पुण्यातील मुक्काम आणि पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार

Gadchiroli: गडचिरोलीत गांजा लागवड प्रकरण उघड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोलीत गांजा लागवड प्रकरण उघड; 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी गांजा लागवड करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

धानोरा पोलीस ठाणे हद्दीतील परसवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

मोरेश्वर हिरामण उसेंडी वय 58 असे आरोपीचे नाव असून त्याच्या शेतातून तब्बल 54.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

या मुद्देमालाची किंमत सुमारे 27 लाख 25 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune: पुण्यातील १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

पुणे -

पुण्यातील १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

पाल्यांचा प्रवेश घेताना पालकांनी सावधानता बाळगावी - पुणे महानगरपालिकेचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन..

गडचिरोलीत गांजा लागवड प्रकरण उघड; 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी गांजा लागवड करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. धानोरा पोलीस ठाणे हद्दीतील परसवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. मोरेश्वर हिरामण उसेंडी वय 58 असे आरोपीचे नाव असून त्याच्या शेतातून तब्बल 54.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे 27 लाख 25 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काळाराम मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सत्कार..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन..

अनेक साधू महंतांनी उपस्थिती...

काळाराम मंदिरावर फडकावला जातोय धर्मध्वज...

काळाराम मंदिराच्या 70 फूट उंच शिखरावर असलेल्या 21 फुट उंच पितळी ध्वजदंडावर, यापाऊढे 11 फुटी धर्मध्वज फडकणार...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळाराम मंदिरावर फडकणार धर्मध्वज

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही वेळातच नाशिकच्या काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकणार आहे.. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गोदाआरतीचा सोहळा पार पडणार आहे..

कल्याण डोंबिवलीत पाणी कपातीच संकट,नागरिकांना साठवणुकीचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने जलसंपदा विभागासोबत महत्त्वाची बैठक घेऊन पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेतला आहे.

भंडाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

भंडारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडारा, तुमसर, मोहाडीसह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली.

सध्या भातपीक कापणीला आलेल असताना या वादळीवाऱ्यासह मागील दोन दिवसांपासून भातपीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय.

आज पुन्हा तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं कापणीला आलेला भातपीक जमीनदोस्त झाला आहे.

नंदूरबारच्या नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तांडव

  • नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तांडव

  • वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे विजेचे खांब कोसळले

  • वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

मुंबईकरांचा खोळंबा, अॅक्वा लाईन मेट्रोमध्ये बिघाड

वाशिममध्ये  वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळीचे नुकसान

वाशिमच्या रिसोड शहरासह कंकरवाडी, आगरवाडी सह तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्या सह जोरदार पडलेल्या अवकाळी पाऊसमुळे केळीचे अतोनात नुकसान झाले आहे.येत्या काही दिवसात या केळी चे उत्पादन सुरू होणार होते.

पुण्यात लग्नास नकार दिला म्हणून चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू

  • पुण्यातील २२ वर्षीय तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक

  • मागील आठवड्यात प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे केला होता तरुणीवर चाकूने हल्ला

  • संबंधित घटनेतील आरोपीला चंदन नगर पोलिसांनी केली अटक

  • दोघे ही पुण्यातील एका नामांकित मॉल मध्ये काम करत होते

  • चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजण्यास चंदन नगर परिसरात असलेल्या तरुणीच्या घरी घडला

बारामतीच्या इंदापुरात खडकवासल्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रामक

खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी पुण्याच्या इंदापुरात शेतकरी आक्रमक झालेत.

पाण्याअभावी पिके जळत असल्याने खडकवासला कॅनॉल वरील लाभधारक शेतकऱ्यांची रुई येथे बैठक पार पडली आहे.

खडकवासला कालव्याचे दुसरे उन्हाळी आवर्तन तात्काळ मिळालं नाही तर मोठं जनआंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.

मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ भंगार गोदामाला भीषण आग

० मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक हॉटेल मानस शेजारील घटना

० आगीत भंगार गोडाऊन जळून खाक

० माणगाव नगरपंचायत अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

० भंगार गोडाऊन मधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक

० वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

० आगीत रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक पीक अप टेम्पो देखील जळून खाक झाला

धुळ्यात शिरपूर मध्ये सहापैकी चार पेट्रोल पंप पेट्रोल शिल्लक नसल्यामुळे बंद

शिरपूर शहरात एकूण सहा पेट्रोल पंप असून त्यापैकी चार पेट्रोल पंप पेट्रोल शिल्लक नसल्यामुळे बंद पडले आहेत, आणि त्यामुळे उर्वरित दोन पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

कास पठारावर घाटाई देवी रस्त्यावर चार चाकी वाहन चालकाला झाले बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण 

कास पठारावर एका वाहन चालकाला घाटाई देवी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे... या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे अनेक वन्यप्राणी या रस्त्यावर पाहायला मिळतात. रात्रीच्या सुमारास साताऱ्याकडून घाटाई देवीच्या दिशेने निघालेल्या एका वाहनचालकाला रस्त्यालगत असणाऱ्या चारीत बिबट्याचे दर्शन झाले यानंतर बिबट्याने रस्ता ओलांडून समोरील झाडीत निघून गेला.यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कासा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवारांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली. देशात दररोज सरासरी २४ बलात्काराच्या घटना घडत असून, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोस्को अंतर्गत सुमारे १३ हजार प्रकरणे नोंदवली जातात, तर एका वर्षात सुमारे ५० हजार विनयभंगाच्या घटना घडतात. याशिवाय, सुमारे दीड लाख महिलांच्या बेपत्ता होण्याच्या केसेस प्रलंबित असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली.चाकण, बीड, गोंदिया, बारामती, बदलापूर आणि मावळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक प्रकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Kalyan: कल्याणमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या 

कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणारे तीन सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय ढेकळे, शहबाज खान ,अशोक मोरे अशी या आरोपींची नावे आहेत .कल्याण रेल्वे स्थानकात फिरत असताना कल्याण रेल्वे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी याआधी किती मोबाईल चोरले आहेत. मोबाईल चोरून करून हे कोणाला विकतात? याचा तपास आता कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरू केलाय.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू

५ वाजता छातीत दुखूनही ९ पर्यंत उपचार नाहीत

ॲम्बुलन्सऐवजी सुप्रिडेंटच्या गाडीतून रुग्णालयात आणल्याचा आरोप

संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात घातला गोंधळ

पावसामुळे सातपुड्यातील नदींना पूर

काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे सातपुड्यातील नदींना पूर..

भर उन्हाळ्यात सातपुड्याच्या नद्यांना आला पूर....

तळोदा तालुक्यातील गायमुखी, हातबारी, रावलापाणी, आक्राणी, केलीपाणी, घोडमांग, विहिरीमाळ आणि बोरवान परिसरात झाला होता पाऊस...

दीर्घकाळ कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये या पावसामुळे पुन्हा पाणी...

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात भीषण अपघात

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात भीषण अपघात....

ट्रकचा टायरची हवा तपासतानाच टायरचा भीषण स्पोट...

टायरमधील हवा तपासणे चालकाचा जीवावर बेतले...

टायर फुटल्याने हवेच्या प्रचंड दाबाने चालकाचा घेतला बळी...

सिमेंट वाहतूक करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

विजय थलापती उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग एसटी बसला अपघात

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग एसटी बसला अपघात,अज्ञात रूई भरून नेणाऱ्या ट्रकने दिली धडक

धडकेत एसटी चालक-वाहक गंभीर जखमी तर चार प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती

हा अपघात एवढा भीषण होता की,चालक ला बाहेर काढण्यासाठी अर्धा तास एवढा वेळ लागला

नागपूर वरून यवतमाळ मार्ग आर्णी कडे जातांना अपघात,आर्णीच्या सातारा फाट्याजवळील घटना

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूर दिग्रस एसटी बसला अपघात

पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील वसईवाडी येथील तळेरान गावात अत्यंत हृदयद्रावक घटना

पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू

श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे अशी मृत मुलांची नावं आहेत.

औंढा नागनाथ मंदिरात भाविकांना दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

औंढा नागनाथ मंदिरात भाविकांना दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

भाविकांच्या जीवाशी औंढा नागनाथ संस्थांनाचा खेळ

पाणी शुद्धीकरण फिल्टर मध्ये चक्क शेवाळ

भाविकांना गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता

मंदिरात आलेले भाविक आणि पुजाऱ्यांनी प्रकार केला उघड

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा,   बारामती तालुका पोलिसांची कारवाई, चार आरोपी अटकेत

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा

बारामती तालुका पोलिसांची कारवाई चार आरोपी अटकेत

तासगावच्या व्यापाऱ्याला बारामतीत लुटले

पोलिसांनी पाठलाग करून पकडले

८ लाखाच्या दागिन्यांसह जवळपास १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा भुईमूग पिकाला फटका

नांदेड जिल्ह्याचे तापमान 43 अंश डिग्री सेल्सियसच्या वर पोहचले आहे.

नांदेड जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

यंदा देखील भुईमूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

वाढत्या तापमानाचा फटका भुईमूग पिकाला बसला आहे.

एफआरपीला १०० रुपये वाढवून देणे हा निर्लज्जपणा; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टीका

एफआरपीला केवळ शंभर रुपये वाढवून देणे हा निर्लज्जपणाचा कळस

1820 रुपये प्रतिटन खर्च येतो असं सरकार म्हणतं हे चुकीच आहे

सरकारचा हिशोबाप्रमाणे आता 3650 रुपये एफआरपी मिळणार आहे

याचा अर्थ सरकर शेतकऱ्याला 100 टक्के नफा देत आहे.

उजनीत साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 31 टीएमसी इतकाच पाणीसाठा

पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायणी ठरलेलं उजनी धरण मायनस आज मध्ये गेल आहे. सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 31 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

उजनी धरण 100% क्षमतेने भरते त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो.यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो.

चांदवडमध्ये खळबळ ५० हजार रुपयांची लाच घेताना महिला मंडळ अधिकारीला अटक

चांदवड जमिनीचा ताबा देण्यासाठी आणि न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. योगिता आनंद भोये (वय ३८) असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नवापूरमध्ये बनावट युरिया कारखान्यावर छापा , 22 लाखांचा बनावट युरिया खतासह मुद्देमाल जप्त

खरीप हंगामाच्या तोंडावर नवापूरमधील धनलक्ष्मी पार्क परिसरात सुरू असलेल्या बनावट युरिया निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 22 लाख 11 हजार 400 रुपयांचा बनावट युरिया तयार करण्याचा साहित्य आणि साठा जप्त करण्यात आला आहे.

बंगाल-आसाममध्ये भाजपला जनतेचा कौल; वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष

बंगाल, आसाम व पोंडीचेरी येथील भारतीय जनता पार्टीने विजय प्राप्त केल्याने वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडत,पश्चिम बंगाल येथील प्रसिद्ध झालमुरी वाटप करून आंनद साजरा करण्यात आला,विकासाच्या मुद्द्यांवर भाजपला पाठिंबा मिळाल्याचा दावा करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच या तिन्ही राज्यांतील जनतेचे मनापासून आभार मानले.यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला अडसर

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला नवीन अडसर निर्माण झालाय. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा आता मेऐवजी जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. शहराच्या नव्या पाणी योजनेसाठी जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलच्या गेटमध्ये गळती आढळली आहे. यासोबतच अँप्रोच ब्रिजवरील चेअरबेड्सनाही तडे गेल्याचे समोर आले आहे. या त्रुटींबाबत न्यायालयीन समितीने अडीच महिन्यांपूर्वीच तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. समितीने दाखवून दिलेल्या त्रुटींपैकी सुमारे ५० टक्के त्रुटी अजूनही प्रलंबित असल्याचं सांगितलं जातंय. आता जॅकवेल गेटची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे.

Wardha: बंगाल-आसाममध्ये भाजपला जनतेचा कौल; वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष

बंगाल, आसाम व पोंडीचेरी येथील भारतीय जनता पार्टीने विजय प्राप्त केल्याने वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने फटाके फोडत,पश्चिम बंगाल येथील प्रसिद्ध झालमुरी वाटप करून आंनद साजरा करण्यात आला,विकासाच्या मुद्द्यांवर भाजपला पाठिंबा मिळाल्याचा दावा करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच या तिन्ही राज्यांतील जनतेचे मनापासून आभार मानले.यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पनवेलच्या कंळबोळीत तांत्रिक बिघाडामुळे समस्या

अनेक रेल्वे उशिराने

प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास

Beed: धारूरमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे अपहरण; ४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथे दिवसाढवळ्या एका शेतकऱ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 04 इसमां विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिमिता दिनकर मैंद (वय 40, व्यवसाय – शेती व घरकाम, रा. मैंदवाडी ता. धारूर, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 4 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12.50 वाजण्याच्या सुमारास त्या घरी असताना त्यांच्या पुतण्याचा फोन आला. त्यावेळी त्याने सांगितले की, त्यांच्या पती दिनकर मैंद हे धारूर येथील कृषी सेवा केंद्राजवळ असताना चार अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकून पळवून नेले.

Pune: एमपीसीबीचा दणका! पुण्यातील २५ टक्के 'आरएमसी' प्रकल्पांना टाळे

एमपीसीबीचा दणका पुण्यातील २५ टक्के 'आरएमसी' प्रकल्पांना टाळे

काँक्रीटचा पुरवठा करणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही वाढत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गेल्या वर्षीपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील २५ टक्क्यांहून अधिक आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले

पुणे जिल्ह्यात एकूण ३५० आरएमसी प्रकल्प आहेत. त्यापैकी पुण्यात १०५, पिंपरीं-चिंचवडमध्ये १२२ आणि ग्रामीण भागात १२३ आरएमसी प्रकल्प आहेत.

प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी १०३ आरएमसी प्रकल्पांना कारवाईची पहिली नोटीस बजाविण्यात आली. तसेच, १२ प्रकल्पांना पुढील कारवाईची दुसरी नोटीस बजावली गेली.

Ravet: रावेत आणि देहू रोड परिसरात बिबट्याचा वावर,

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत आणि देहू रोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे. रावेत आणि देहू रोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे. या बिबट्याने एका कुत्र्याची शिकार देखील केली आहे. त्यामुळे रावेत आणि देहूरोड परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक रावेत देहू रोड परिसरामध्ये बोलवण्यात आला आहे. रावेत परिसरातील मस्के वस्ती आणि देहू रोड ऑडनेस फॅक्टरी परिसरामध्ये या बिबट्याचा वावर सध्या होत आहे.

Jalna: जालन्यात स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग, आगीच कारण अद्याप अस्पष्ट

जालन्यात स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.जालना शहरातील खरपुडी रोडवरील स्क्रॅपच्या दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागलीय.आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.या आगीमध्ये जवळपास सात ते आठ दुकानांसह दोन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती आहे.दरम्यान अग्निशमक दलाने पाच तासाच्या अथक प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणली आहे.

Pune: खासगी संस्थांच्या परीक्षांना झेडपी शाळांमध्ये बंदी

खासगी संस्थांच्या परीक्षांना झेडपी शाळांमध्ये बंदी

शिक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत ठराव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या बाह्य परीक्षांना पूर्णतः बंदी घालण्याचा ठराव शिक्षण व क्रीडा समितीच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला*

शासन व जिल्हा परिषद यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांच्या परीक्षा शाळांमध्ये आयोजित करू नयेत, असा ठराव मंजूर

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त परीक्षांचा ताण कमी होणार असून शैक्षणिक प्रक्रियेला अधिक शिस्तबद्धता येण्याची अपेक्षा

Hingoli: हिंगोलीत वादळी वाऱ्याने विजेच्या तारा वाकल्या, शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले

हिंगोली जिल्ह्यात काल वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे, तर याच वादळीवाऱ्याने आग लागल्याची देखील घटना घडली आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ गावात वादळी वाऱ्याने विजेच्या तारांवर शॉर्टसर्किट झाले आणि त्याच्या आगीच्या ठिणग्या शेतकऱ्याच्या घरावर पडल्या त्यामुळे मोठी आग लागली आहे या आगीत विनोद लोणकर व विनायक तुरुकमाने या दोन शेतकऱ्यांची घरे भस्मसात झाली आहेत, घरातील संसार उपयोगी साहित्य धान्य आणि शेतकऱ्यांनी हळद विक्री करून घरी आणलेले रोकड देखील जळाली आहेत.

Pune: हत्तीपाय रोगाचे पुणे जिल्ह्यात 44 रुग्ण

हत्तीपाय रोगाचे पुणे जिल्ह्यात 44 रुग्ण

पुणे पिंपरी चिंचवड सह ग्रामीण भागात शिरकाव

लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीपाय) या आजाराचा ‘सायलेंट’ प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सक्रिय सर्वेक्षणासाठी रात्री विशेष मोहीम

विदर्भातील जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या हत्तीपाय रोगाचा शिरकाव आता पुण्यातही

बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झाले असल्याची माहिती

वर्षभरासाठी विशेष पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला असून, उच्च-जोखमीच्या भागांमध्ये तपासणीवर भर दिला जाणार

या आजारात मायक्रोफिलेरिया रात्री रक्तात जास्त प्रमाणात आढळतात, तर दिवसा ते शरीराच्या खोल भागात लपलेले असतात. त्यामुळे रात्री घेतलेले रक्तनमुने अधिक अचूक निदानासाठी उपयुक्त ठरणार

Dharashiv: धाराशिवमध्ये सलग चार दिवसापासून पेट्रोल डिझेलची टंचाई

धाराशिव मध्ये सलग चार दिवसापासून पेट्रोल डिझेलची टंचाई

टंचाईचा शेती कामांना मोठा फटका,पेरणीपूर्व मशागतीची काम खोळंबली

डिझेल नसल्याने ट्रॅक्टरची चाक जाग्यावरच, मोठ्या प्रमाणात नांगरणी बाकी

शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर मालकाकडे येरझाऱ्या नांगरणी बाकी,

ट्रॅक्टर चालक डिझेलच्या प्रतीक्षेत, शेतातील नांगरणीची काम थांबली

अनेक पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर मालकांच्या रांगा

नागपूर शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह नऊ जणांचे निलंबन

नागपूर शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह नऊ जणांचे निलंबन

एकाच वेळी 9 जणांवर निलंबनाच्या कारवाईमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे...

नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई केली आहे...

पाचशे रुपयांच्या बॅटिंगच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी थेट मुंबई पुण्यापर्यंत तपास केला.

Bhandara: पवनी तालुक्यात बिबट्याची दहशत संपली! २६ शेळ्यांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर जेरबंद...

पवनी तालुक्यातील नेरला परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या आणि तब्बल २६ शेळ्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. अड्याळ जवळील नेरला २६ शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर जवळील कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. मात्र रात्री त्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला जेरबंद करून वैद्यकीय तपासणी प्रक्रियेनंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कृञिम तुटवडा निर्माण जास्त किंमतीत विक्री सुरु

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कृञिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी व गैरप्रकारांवर कारवाई करावी

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची जिल्हाधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मागणी

सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाची आर्थीक पिळवणूक,शेती कामांनाही बसतोय फटका

प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन साठ्याची पारदर्शक माहिती जाहीर करावी, खासदार ओमराजे निंबाळकर यांची पञाद्वारे मागणी

Pune: ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या "नराधम आजोबा" वर गुन्हा दाखल

९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या "नराधम आजोबा" वर गुन्हा दाखल

"नराधम आजोबा" ला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

पुण्यातील पर्वती मध्ये झालेल्या प्रकरणात नराधमाला अटक

९ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दारूच्या नशेत "आजोबाकडून" चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

रात्री उशिरा या ज्येष्ठ व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई

Pune: पुण्यातील नवले पुलासह शहरातील संवेदनशील ठिकाणी आंदोलनास मनाई

पुण्यातील नवले पुलासह शहरातील संवेदनशील ठिकाणी आंदोलनास मनाई

नसरापूर येथील घटनेनंतर नवले पुलावर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय

शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन आणि ‘रास्ता रोको’ करण्यास मनाई

नसरापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येत अचानक नवले पूल परिसरात ठिय्या आंदोलन केले होते

अनेकदा आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो

यापुढे नवले पूल परिसर तसेच शहरातील कोणत्याही संवेदनशील चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर आंदोलनास किंवा ‘रास्ता रोको’ला पोलिसांकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही

Narsapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

या प्रकरणातील नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू

येत्या १५ दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती

विशेष पथकाकडून फिर्यादी आणि आरोपींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरू

या नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून भक्कम तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे एकत्रित करण्याचे काम

Dharashiv: धाराशिवमध्ये इंधनाचा पुरवठा सुरळीत,अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसून सर्व पंपांवर नियमित पुरवठा सुरू आहे.त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी,असे आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अतिरिक्त साठा करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.मात्र,जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.तसेच,जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पेट्रोल पंपांची सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.तपासणीदरम्यान कोणताही दोष आढळल्यास संबंधित पंप चालकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.काही अडचण आल्यास नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Maan: माण-खटावमध्ये ५५ हून अधिक टँकरची मागणी असताना प्रशासन मात्र सुस्त

माण आणि खटाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप शरद चंद्र पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी केला आहे. तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरे-ढोरे घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. सध्या माण तालुक्यातील ५५ ते ६० गावांनी प्रशासनाकडे टँकरची अधिकृत मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने केवळ १७ गावांनाच टँकर मंजूर केले आहेत. उर्वरित गावांतील नागरिकांनी पाणी कोठून आणायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात २०० लिटर पाण्यासाठी सर्वसामान्यांना ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. यावेळी त्यांनी मान खटाव विधानसभेचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता यांच्यावर निशाणा साधत टीका केलीये "स्वतःला 'जलनायक' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यात जर जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असेल, तर हे त्यांचे अपयश आहे. केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा जमिनीवर उतरून लोकांची तहान भागवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले याबाबतचे निवेदन शप चे राज्य प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी केला आहे

Pune: पुण्यातील पर्वती परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार;नागरिकांकडून रात्री आंदोलन

पुण्यातील पर्वती परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्याच आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांकडून पर्वती पायथा परिसरात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते.

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुर

महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असून इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com