Surabhi Jayashree Jagdish
आधार कार्ड अपडेट करणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्यामुळे तुमची ओळख माहिती अचूक आणि अपडेटेड राहते. वेळोवेळी बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती अपडेट करणे गरजेचं असतं. सरकारने यासाठी ठराविक शुल्क आणि प्रक्रिया निश्चित केली आहे.
आधार अपडेट करण्यासाठी तुम्ही अधिकृत आधार सेवा केंद्रात जाऊ शकता. ही केंद्रं UIDAI द्वारे मान्यताप्राप्त असतात आणि सुरक्षित सेवा देतात. जवळच्या केंद्राची माहिती ऑनलाइन शोधून तुम्ही वेळ वाचवू शकता.
काही अपडेट्स तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही करू शकता, जसं की पत्ता बदलणं. मात्र बायोमेट्रिक अपडेटसाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाणं आवश्यक असतं. ऑनलाइन सेवा वापरताना अधिकृत वेबसाईटच वापरणं सुरक्षित असते.
फिंगरप्रिंट, आयरीस आणि फोटो अपडेट करण्यासाठी 125 रुपये शुल्क आकारलं जातं. ही प्रक्रिया प्रत्यक्ष आधार केंद्रावरच केली जाते. बायोमेट्रिक माहिती अचूक ठेवणं ओळख पडताळणीसाठी आवश्यक असतं.
5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य असते. ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते. योग्य वयात अपडेट केल्याने भविष्यातील अडचणी टाळता येतात.
नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता यांसाठी कागदपत्र अपडेट करण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारलं जातं. योग्य कागदपत्रं अपलोड किंवा सादर करणं आवश्यक असतं.