walking after meals google
लाईफस्टाईल

Walking Benefits: जेवणाआधी की जेवणानंतर, चालण्याची योग्य वेळ कोणती? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्ताची माहिती

Weight Loss Tips: जेवणाआधी किंवा जेवणानंतर चालण्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे पचनक्रिया सुधारते. पुढे डॉक्टरांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आता फिटनेसलाही महत्व दिलं जातंय. कारण म्हातारपणात जाणवणाऱ्या समस्या या तरुणांमध्ये वाढताना दिसत आहेत. तिशीतच अनेकांना बसता उठताना त्रास, कमी झोप, सांधे दुखी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.

तरुणच नाही तर ६० ते ७० वयोगटातले लोकही फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचा पर्याय निवडतायेत. पण याची सुरुवात थेट जीममध्ये जाऊन करत नाहीत. यासाठी चालण्याच्या माध्यमातून करतात. चालल्याने तुमच्या शरीरातली शुगर नियंत्रणात येते, तुमचं ह्रदय सुरळीत काम करतं, पचनक्रिया सुधारते, तुमची चिडचिड कमी होते. पण जेवल्यानंतर चालणं योग्य की जेवणाआधी? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेऊयात.

उपाशीपोटी चालल्याने काय फायदा होतो?

सकाळी रिकाम्या पोटी चालल्यावर शरीराला एनर्जी मिळवण्यासाठी साठवलेल्या चरबीचा वापर करावा लागतो. त्यामुळे रोज हे रुटीन फॉलो केलं तर वजन कमी होतं. तसेच जेवणाआधी चालल्यावर भूक नियंत्रित राहत नाही आणि अनेकजण जास्त हेल्दी अन्नपदार्थांची निवड करतात. चालण्यामुळे मन शांत राहतं, ताण कमी होतो आणि जास्त भूक लागत नाही.

जेवणानंतर चालल्याने काय फायदा होतो?

जेवणानंतर चालल्यावरही फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर १० ते १२ मिनिटांच्या आत कमी वेगात चालल्यावर रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहतं. तसेच डायबेटीज किंवा प्रीडायबेटीजच्या रुग्णांना याचा जास्त फायदा होऊ शकतो. चालण्यामुळे स्नायू तुमच्या आहारातून मिळालेल्या ग्लुकोजचा वापर करतात. त्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालण्याचा पर्याय निवडू शकता. फक्त चालण्याची सवय ही थांबवू नका.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT