Sakshi Sunil Jadhav
धुक्याने झाकून गेलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे, हिरवागार परिसर आणि गरमागरम चहा यांचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईजवळच्या पुढील सुंदर ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
पावसाळ्यात लोणावळा धबधबे, हिरवीगार दरी आणि टेकड्यां पाहण्यासाठी तुम्ही लोणावळ्यात जाऊ शकता. भुशी डॅम, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट हे ठिकाण बेस्ट आहेत. यासाठी खर्च हा ₹800 ते ₹2,500 रुपयांपर्यंत येईल.
रोजच्या प्रवासातून लांब वेळ घालवायचा असेल तर माथेरान हा बेस्ट ऑप्शन आहे. नेरळपर्यंत रेल्वेने जाऊन पुढे टॉय ट्रेन किंवा हॉर्स रायडींगने तुम्ही प्रवास करू शकता. यासाठी ₹1,000 ते ₹3,000 पर्यंत खर्च येईल.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं इगतपुरी हे ठिकाण धबधबे, ट्रेकिंग आणि एकांतात वेळ घालवण्यासाठी खूपच सुंदर आहे. इथे तुम्हाला ₹800 ते ₹2,500 रुपयांपर्यंत खर्च येईल.
ट्रेकिंग प्रेमींसाठी राजमाची हा पावसाळ्यातला सर्वात लोकप्रिय किल्ला असल्याचं लोक सांगतात. लोणावळा किंवा कोंडाणे गावातून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता. यासाठी बजेट ₹700 ते ₹2,000 लागतं.
कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला पिकनिकसाठी कमी बजेटमध्ये बेस्ट आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळ हे ठिकाण आहे. यासाठी तुम्हाला ₹1000 ते ₹1500 रुपयांपर्यंत खर्च येतो.
पावसाळ्यात सगळेच लोणावळ्याजवळच्या भुशी डॅमला भेट देतात. लोणावळा स्टेशनवरून स्थानिक वाहनांनी तिथे सहज पोहोचता येतं. याचा खर्च ₹800 ते ₹2,000 एका व्यक्तीचा होऊ शकतो.
शांत वातावरण, रंधा धबधबा आणि आर्थर लेक पाहायचा असेल तर पावसाळ्यातच ही पिकनिक प्लान करा. याचा अंदाजे खर्च हा ₹1,500 ते ₹4,000 पर्यंत येईल.