liver health google
लाईफस्टाईल

Liver Disease Symptoms: रात्री १ ते ३ दरम्यान जाग येतेय? असू शकतो लिव्हरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

Insomnia Symptoms: रात्री १ ते ३ वाजता झोपमोड होतेय का? तज्ज्ञांच्या मते, ही केवळ झोपेची अडचण नसून यकृतावर ताण दर्शवणारी चेतावणी असू शकते. कारण जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

झोप ही शरीरासाठी सर्वात आवश्यक प्रक्रिया मानली जाते. शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी, मेंदूला विश्रांती मिळावी यासाठी गाढ झोप गरजेची असते. मात्र अनेकांना रात्री १ ते ३ वाजता अचानक जाग येते. हे लक्षण फक्त झोपेचा अडथळा नसून आरोग्याशी, विशेषतः लिव्हरशी संबंधित संकेत असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

पारंपरिक चिनी औषधशास्त्रानुसार शरीरातील प्रत्येक अवयव विशिष्ट वेळेत सर्वाधिक सक्रिय असतो. त्यात रात्री १ ते ३ या वेळेत लिव्हरचे कार्य जास्त तीव्रतेने चालतं. त्यामुळे या वेळेत झोपमोड होणं म्हणजे लिव्हरच्या उर्जेत असंतुलन किंवा ताण असल्याचे संकेत असू शकतात.

लिव्हर हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि अन्नातील पोषक द्रव्यांचे रूपांतर करण्याचं काम करतं. झोपेत अडथळा आल्यास शरीरातील कोर्टिसोल, मेलाटोनिन आणि इन्सुलिन या हार्मोन्सवर परिणाम होतो, त्याने लिव्हरच्या कार्य बिघडतं. फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स यांसारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

संशोधनांनुसार गाढ झोपेमध्ये शरीरातील ग्लायम्फॅटिक सिस्टीम सक्रिय होते. जी मेंदू आणि शरीरातील अपायकारक द्रव्ये आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचे कार्य करते. जर झोपेची गुणवत्ता खालावली, तर शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि inflammation वाढतो. ज्यामुळे लिव्हरचे एन्झाइम्सही वाढतात हे लिव्हरवर ताण येण्याचे लक्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor scandal: 'दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला...', प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप, रडत म्हणाली...

Diwali 2025 Astrology: १०० वर्षानंतर दुर्मिळ योग, दिवाळीपासून या 3 राशींचे नशीब बदलणार, मोठा धनलाभ होणार

Walmik Karad: वाल्मीक कराड जेलमध्ये, पण बाहेर पैशाची मागणी; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, बॅनरवर मुंडे बहीण-भावाचा फोटो

Maharashtra Live News Update : रोहिणी खडसेंना पुणे पोलिसांची नोटीस

PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

SCROLL FOR NEXT