Urinary Problems: रात्री वारंवार लघवी होतेय? पुरुषांना असू शकतो हा गंभीर आजार; वेळीच व्हा सावध, अन्यथा...

Prostate Health: पुरुषांमध्ये वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची समस्या (BPH) सामान्य आहे. यामुळे लघवीचा प्रवाह कमी होतो, वारंवार लघवी लागते आणि मूत्राशय रिकामा न झाल्यासारखे वाटते.
Urinary Problems
Stomach Gas Problemfreepik
Published On

अनेक पुरुषांना वाढत्या वयानुसार लघवीशी संबंधित त्रास जाणवायला सुरुवात होते. वारंवार लघवी लागणं, लघवी करताना त्रास होणं किंवा मूत्राशय पूर्णपणे रिकामा न झाल्यासारखे वाटणं ही सर्व लक्षणे Benign Prostatic Hyperplasia म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीचा वाढलेला आकार या कारणांमुळे उद्भवू शकतात.

BPH म्हणजे काय?

BPH हा on-cancerous पण गंभीर आजार आहे. यामध्ये पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, ज्यामुळे मूत्रमार्गावर दाब येतो आणि लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. अमेरिकेतील National Institute of Diabetes and Digestive and Kidney Disease च्या अहवालानुसार, ५० वर्षांवरील सुमारे ५०% पुरुषांना काही प्रमाणात BPH ची लक्षणे दिसतात.

Urinary Problems
Cold Cough Remedies: मुलं सर्दी-खोकल्याने आहेत हैराण? मग सिरप कशाला? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

कारणं आणि जोखीम घटक (Causes and Risk Factors)

१ वय

वयानुसार प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची शक्यता वाढते.

२ हार्मोन्समध्ये बदल

(DHT) या हार्मोनचे प्रमाण वाढल्यास धोका जास्त वाढतो.

३ कौटुंबिक इतिहास

कुटुंबात कोणाला BPH असल्यास धोका जास्त वाढतो.

४ जीवनशैली

चुकीचा आहार, लठ्ठपणा, आणि चुकीची जीवनशैली हे घटक कारणीभूत ठरतात.

BPH ची लक्षणे (Symptoms)

१ वारंवार लघवी होणे.

२ लघवीचा प्रवाह कमकुवत होणे.

३ मूत्राशय पूर्णपणे रिकामा न झाल्याची भावना जाणवणे.

४ लघवी सुरू करण्यात अडचण येणे.

५ लघवीच्या शेवटी थेंबथेंब गळणे.

६ उपचार न केल्यास धोके

BPH चा उपचार उशीराने केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्ग, bladder stones, आणि kidney damage होऊ शकतो. शिवाय काम, झोप, आणि सामाजिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो. डॉक्टर वैद्यकीय इतिहास, uroflowmetry, मूत्र तपासणी आणि Prostate-Specific Antigen चाचणी करणे योग्य ठरेल.

Urinary Problems
SIP Investment Calculation: दर महिन्याला ₹१०,००० गुंतवा अन् ₹७ कोटी मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com