SIP Investment Calculation: दर महिन्याला ₹१०,००० गुंतवा अन् ₹७ कोटी मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Mutual Fund India: दर महिन्याला १० हजार रुपयांची एसआयपी केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीतून तब्बल ₹७ कोटींचा निधी तयार होऊ शकतो. जाणून घ्या यामागचं गणित.
Learn how a ₹10,000 monthly SIP can grow into ₹7 crore with 12% annual returns
SIP Investment google
Published on
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealth
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealthgoogle

तुम्ही दर महिन्याला फक्त १० हजार इतकी रक्कम म्युच्युअल फंडात एसआयपी (Systematic Investment Plan)मध्ये गुंतवली, आणि त्यावर सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर काही काळातच ही छोटीशी गुंतवणूक तब्बल ₹७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चक्रवाढीचा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रभाव किती मोठा असतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealth
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealthgoogle

एसआयपी हा गुंतवणुकीचा एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग. यात गुंतवणूकदार दर महिन्याला, तिमाही किंवा वार्षिक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात. या पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे बाजाराच्या चढउताराचा धोका कमी होतो आणि रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंगच्या तत्त्वावर याचे काम सुरु राहते. म्हणजे बाजारातील भाव पडला तर जास्त युनिट्स मिळतात, तर बाजार वाढला तरी दीर्घकाळात सरासरी किंमत फायदेशीर ठरते.

How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealth
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealthgoogle

किती वर्षांत मिळतील ₹७ कोटी?

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले, तर १० वर्षांत तुमची गुंतवणूक २३.२४ लाखांपर्यंत वाढते. या दिवसांमध्ये एकूण गुंतवणूक १२ लाख असते. २० वर्षांनंतर हीच गुंतवणूक जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. २५ वर्षांत ती १.९० कोटी, तर ३० वर्षांत ३.५३ कोटी होते.

How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealth
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealthgoogle

याच चक्रवाढीच्या परिणामामुळे ३५ वर्षांपर्यंत गुंतवणूक चालू ठेवल्यास एकूण ४२ लाखांच्या गुंतवणुकीवर निधी तब्बल ६.४९ कोटींवर पोहोचतो. म्हणजेच अजून काही वर्षे सातत्य ठेवले, तर ७ कोटी रुपयांचा टप्पा सहज गाठता येतो.

How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealth
How Compounding Turns ₹10K Monthly SIP into ₹7 Crore Wealthgoogle

काही तज्ज्ञ सांगतात की, ''एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बेस्ट पर्याय आहे. कारण चक्रवाढीमुळे पैसा हळूहळू exponential पद्धतीने वाढतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत बाजारातील अस्थिरतेचा फायदा मिळतो आणि जोखीमही तुलनेने कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज राहत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com