Vivah Muhurat 2025 Date Saam Tv
लाईफस्टाईल

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

2026 Hindu Wedding Dates: पुढच्या वर्षात लग्न करण्याचा प्लान करत असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्वाची बातमी आहे. २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त आहेत. आताच तारखा बघून घ्या...

Priya More

Summary -

  • २०२६ मध्ये एकूण ५९ शुभ विवाह मुहूर्त

  • जानेवारी महिन्यात एकही शुभ मुहूर्त नाही

  • पहिला मुहूर्त ५ फेब्रुवारी रोजी सुरू होतो

  • शेवटचा शुभ विवाह दिवस ६ डिसेंबर २०२६ आहे

नवीन वर्षात म्हणजे २०२६ मध्ये लग्न करण्याचा प्लान करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२६ हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. २०२६ या वर्षात एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. या तारखांना लग्नासाठी खूपच चांगल्या असणार आहे. २०२६ मधील कोणत्या महिन्यात किती शुभ मुहूर्त आहेत हे आपण जाणून घेणार आहोत....

२०२६ या वर्षाची सुरुवात शुभ कार्यांच्या बाबतीत थोडी मंद असेल कारण एकीकडे जानेवारीमध्ये खरमास असेल तर दुसरीकडे शुक्र ग्रह मावळत असेल. यामुळेच वर्षाच्या पहिल्या महिन्यात एकही लग्नाचा मुहूर्त नसणार आहे. पण फेब्रुवारी महिना सुरू होताच पुन्हा लग्नाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. पंचांगानुसार, २०२६ या वर्षात एकूण ५९ शुभ विवाह मुहूर्त असतील. या मुहूर्तावर लग्न करणे हे चांगले असते. त्याचसोबत तुम्ही या दिवशी शुभ कार्य देखील करू शकता.

२०२६ चे शुभ विवाह मुहूर्त कधी सुरू होतील?

- जानेवारी २०२६ चा संपूर्ण महिना लग्नासाठी शुभ नाही

- लग्नाचा पहिला मुहूर्त ५ फेब्रुवारी २०२६ रोजी येईल.

-वर्षातील शेवटचा शुभ काळ ६ डिसेंबर २०२६ रोजी असेल.

- २०२६ मध्ये एकूण शुभ विवाह तारखा - ५९

२०२६ मध्ये लग्नासाठी शुभ तारखा कोणत्या?

मे - १, ३, ५, ६, ७, ८, १३, १४

जून - २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २९

जुलै - १, ६, ७, ११

नोव्हेंबर - २१, २४, २५, २६

डिसेंबर - २, ३, ४, ५, ६, ११, १२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabaleshwar Tourism: फ्रेंड्ससोबत धमाल करायचीये? महाबळेश्वरजवळची ही ‘Hidden’ ठिकाणं ठरतील परफेक्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण अडकले

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानविषयी या गोष्टी माहित आहेत का?

Shocking: कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बेळगावमधील भयंकर घटना

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT