Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Surabhi Jayashree Jagdish

गृहप्रवेशाचा विधी

गृहप्रवेशाचा विधी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत शुभ असा समजला जातो. नववधू घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना तांदळाचं माप ओलांडते. हा सोहळा समृद्धी, ऐश्वर्य आणि नव्या जीवनाची सुरुवात सूचित करतो.

धार्मिक-सांस्कृतिक अर्थ

ही फक्त एक परंपरा नसून त्यामागे अनेक धार्मिक-सांस्कृतिक अर्थ दडलेले आहेत. खाली या परंपरेमागची प्रमुख कारणं सोप्या भाषेत सांगितली आहेत.

घरात समृद्धी येण्याचे प्रतीक

तांदूळ हा समृद्धीचं सर्वात मोठं चिन्ह मानला जातो. नववधूने तांदळाचं माप ओलांडणं म्हणजे धान्यसंपत्ती घरात येण्याची शुभ सुरुवात. यामुळे घरात कधीही अन्नाची किंवा संपत्तीची कमतरता भासू नये हा हेतू असतो.

लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक

नववधूला घराची लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे ती उंबरठा ओलांडताना माप ओलांडते तेव्हा देवी लक्ष्मी स्वतः या घरात प्रवेश करते असा समज आहे.

नव्या जीवनाची भरभराट

मापातून सांडणारे तांदूळ नव्या संसाराची वाढ आणि भरभराट दर्शवतात. नववधूच्या आगमनाने घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता प्रवेश करते असा अर्थ घेतला जातो.

संस्कारांची सातत्यता

ही परंपरा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कृती, मूल्य आणि परंपरा पुढे नेण्याचा संदेश देतो. नववधू घरात आल्यावर ती त्या घरातील संस्कार, प्रेम आणि एकता टिकवेल असा विश्वास असतो.

शुभशकुन निर्माण होणं

तांदळाचा शुभ आवाज आणि कलश हलण्याचा नाद हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं मानण्यात येतं. यामुळे घरात चैतन्य, आनंद आणि मंगलकार्यांची सुरूवात याचा संकेत म्हणून हा विधी पाहिला जातो.

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

येथे क्लिक करा